akshay-nagalkar-murder-case: बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड : आणखी चार आरोपी जेरबंद;दोघांना अहिल्यानगर येथून अटक



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणी आणखी चार आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, अकोला कडुन अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली असून एक आरोपी फरार आहे. तसेच याआधी अटक केलेल्या चार  आरोपीतांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन अकोला येथे फिर्यादी शिला विनायक नागलकर यांनी त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर (वय 26 वर्ष रा. मारोती नगर बाळापुर रोड जुने शहर अकोला) हा दिनांक 22 ऑक्टोबरचे संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास 15 मिनीटात बाहेर जावुन येतो, असे सांगुन घरून गेला तो अद्यापपावेतो परत आला नाही, अशा फिर्यादवरून पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे मिसींग क्रमांक 44/2025 अन्वये मिसींग दाखल करण्यात आली होती.


चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी


स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पहील्या दिवशी चार आरोपी ताब्यात घेतले होते. यामध्ये चंद्रकांत महादेव बोरकर (रा. शिवसेना वसाहात, अकोला), आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे (रा. जुने शहर, अकोला), किष्णा वासुदेव भाकरे (रा. मोठी उमरी जि. अकोला), अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे (रा. मोरगाव भाकरे जि. अकोला) यांचा समावेश आहे. या आरोपींना आज तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी न्यायालया समोर हजर केल्यानंतर सर्व आरोपीतांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 



दोघांना अहिल्यानगरातून अटक


दरम्यान, आज 26 ऑक्टोबर रोजी स्थागुशाचे पथकाने गुन्हयात सहभागी निष्पन्न झालेले आणखी चार आरोपी अटक करून तपास कामी तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले. यामध्ये रोहीत गजानन पराते (रा. पार्वती नगर, बाळापुर नाका, अकोला) अमोल अजाबराव उन्हाळे( रा. हरीहरपेठ, जुने शहर, अकोला) नारायण गणेश मेसरे (रा. बाळापुर जि. अकोला), आकाश बाबुराव शिंदे (रा. भौरद जि. अकोला) यातील आरोपी रोहित पराते आणि अमोल उन्हाळे यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अहील्यानगर येथुन ताब्यात घेतले. 



तसेच नारायण मेसरे यास बाळापुर येथुन ताब्यात घेतले. तर आरोपी आकाश शिंदे यास अकोला रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे गुन्हयातील आठ आरोपी आतापर्यत अटक असुन एक आरोपी  शिवा रामा माळी हा अदयाप फरार आहे. लवकरच त्याला अटक करण्याची तजवीज ठेवली असुन तपास सुरू आहे.


टिप्पण्या