akola-nala-rescue-operation-: भुयारी गटार नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध; 120 कि.मी. अंतरावर पूर्णा नदीपात्रात सापडला




ठळक मुद्दा


तीन दिवस चाललेल्या थरारक शोध मोहिमेनंतर संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे यश



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला शहरातील कॉटन मार्केट चौकाजवळील भुयारी गटार नाल्यात वाहून गेलेल्या सोनु कन्नु करोसिया (वय 41, रा. देशमुख फैल, अकोला) याचा मृतदेह अखेर तीन दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर मिळाला आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगावजवळ पुर्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला.


ही शोध मोहीम मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविली. गटारातील कीचकटी आणि धोकादायक परिस्थितीमुळे हे ऑपरेशन अत्यंत कठीण ठरले. परंतु अखेर रेस्क्यू बोटीद्वारे मृतदेह शोधण्यात यश आले.


या मोहिमेत जिल्हाधिकारी वर्षा मिना  यांच्या आदेशानुसार आरडीसी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार कव्हळे, ठाणेदार शिरीष खंडारे, संजय गवई यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पथकातील ऋषीकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, नितीन कोलटके, शेखर केवट, अश्विन केवट, मयुर सळेदार, विकास सदांशिव, प्रतिक बोरसे, हर्षल वानखडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.


शोध मोहिमेत मनपा अग्निशमन दलाचे मनिष कथले व त्यांचे जवान प्रामुख्याने सहभागी झाले होते. मनपा स.आ. विठ्ठल देवकते, वि.प्र. गजानन घोंगे, स्व.वि.प्र. अलीमखान तसेच सफाई कर्मचारी सहभागी झाले. विर भगतसिंग आपत्कालीन पथक, कुरणखेड यांनीही सहकार्य केले.


घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या पिएसआय स्नेहा शेडगे, हेड काॅन्स्टेबल अक्षय चाटे, होमगार्ड सागर मानकर उपस्थित होते. मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी पटवून दिली असून पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करीत आहेत.




…………………………………..

अकोला बातमी, अकोला दुर्घटना, Cotton Market Akola, नाला अपघात अकोला, Rescue Operation Akola, Sant Gadge Baba Rescue Team, Purna River, Akola Latest News

…………………………………





टिप्पण्या