akola-crime-news-vasubaras: वसुबारस दिवशी अकोल्यात गोमांस विक्रीचा संतापजनक प्रकार; खासदार अनुप धोत्रे आणि आमदार सावरकरांचा पोलिसांना कठोर कारवाईचा इशारा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | वसुबारस या गोमातेच्या पूजनाच्या आणि मातृत्वाच्या सन्मानाच्या दिवशी अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्री होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकल्यावर समाजकंटकांकडून दगडफेक करून तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे.


घटनेनंतर भाजप नेते, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.



खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, “हे सरकार घटनेच्या चौकटीत राहून काम करते. कोणाच्याही दबावाखाली काम होणार नाही. गोमातेचा अवमान करणाऱ्यांना माफी नाही. कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”


यावेळी आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, भरत मिश्रा, करण शाहू, संजय गोटफोडे, पवन महाले, प्रकाश घोगलीया आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.



खासदार धोत्रे व आमदार सावरकर यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अकोला यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, “गोमातेचे रक्षण हा आमचा धर्म आणि संस्कार आहे, महायुतीच्या काळात अशा प्रकारांना माफी नाही.”


आज घडलेल्या या प्रकरामुळे अकोला शहरात विशेषतः सिटी कोतवाली गांधी रोड परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे वातावरण लगेच निवळले. 




टिप्पण्या