water-discharge-dagdaparwa: दगडपारवा लघु प्रकल्पातून पाणी विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन



ठळक मुद्दे 


दगडपारवा प्रकल्प 100% भरला


सकाळी 7 पासून दोन वक्रद्वारांद्वारे नियंत्रित विसर्ग


16.56 घ.मी./से. पाणी नदीपात्रात सोडले जाणार


नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : दगडपारवा लघु प्रकल्पाचा जलसाठा शंभर टक्के भरला असून, प्रकल्प प्रशासनाने आज सकाळी पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 4 वाजता धरणाची पाणी पातळी 317.200 मीटर इतकी नोंदली गेली. यावेळी प्रकल्पाचा साठा 10.19 दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) इतका होता, जो प्रकल्पाच्या क्षमतेच्या शंभर टक्के आहे.


धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी येव वाढले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी 7 वाजता वक्रद्वार क्रमांक 1 व 4 प्रतेकी 20 सें.मी. उंचीने उघडण्यात येणार आहेत. यामुळे एकूण 16.56 घनमीटर प्रति सेकंद (घ.मी./से.) एवढा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार आहे.


प्रकल्प प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी पात्र ओलांडू नये तसेच गावपातळीवर लोकांना सतर्क करण्यात यावे, असे आवाहन दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष, अकोला यांच्याकडून करण्यात आले आहे.




टिप्पण्या