public-health-family-welfare-: अंगीकृत रुग्णालयांची बिले नियमित अदा करणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर




ठळक मुद्दे


आरोग्यमंत्र्यांची वैद्यकीय व्यावसायिकांशी चर्चा


उत्तम आरोग्य सुविधा हा प्रत्येकाचा अधिकार 



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यादृष्टीने आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध असून, अंगीकृत रूग्णालयांची देयके नियमित अदा केली जातील. उत्तम आरोग्य सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिली. 

अकोला येथील हॉटेल आर. एस. येथे वैद्यकीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, इंडियन मेडिकलअसोसिएशनचे डॉ. संतोष सोमाणी, डॉ. रणजीत देशमुख, अभय जैन, पराग टापरे, डॉ. अग्रवाल आदी उपस्थित होते.



आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले योजनेत रुग्णालयाची देयके दर महिन्याला अदा होतील असा प्रयत्न आहे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक डॉक्टरांनी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अकोला जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर उपस्थित होते.


टिप्पण्या