pinjar-titwa-murder-case-akola: मुलानेच केली वडिलांची हत्या; फरार आरोपीस दोन तासात अटक

स्थानिक गुन्हे शाखा व पिंजर पोलीस पथकाची सयुक्तिक कारवाई


नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम टीटवा येथे मुलानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीस पिंजर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने केवळ दोन तासात शिताफीने अटक केली.



ठळक मुद्दे 


वडिलांचा मुलाकडून काठी व दोरीने गळा आवळून खून


पिंजर पोलिसांत गुन्हा दाखल – कलम 103 (1) BNS


आरोपी रात्रीभर शेतात लपून बसला होता


सकाळी वाशीमकडून पुण्याकडे पळण्याचा प्रयत्न असताना अटक


मोबाईल नसल्याने शोध घेणे झाले आव्हानात्मक


पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


सविस्तर वृत्त

दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दरम्यान ग्राम टीटवा येथील विनोद रामराव राऊत यांनी पिंजर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली की, त्यांचा भाऊ बबन रामराव राऊत (वय 55) याचा त्याच्या मुलानेच खून केला आहे.


आरोपी नवनाथ बबन राऊत (वय 27) याने रात्री 10 ते 12.15 च्या दरम्यान वडिलांवर काठीने हल्ला करून व दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला आणि पसार झाला. या प्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 232/25, कलम 103 (1) BNS प्रमाणे खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.


घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पिंजर पोलीस ठाण्याच्या तीन वेगवेगळ्या पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले. मुलानेच वडिलांचा खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आरोपी रात्रभर शेतात लपून बसला होता.


पोलीस पथकांनी कसून शोध घेत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी आरोपी शेलू (जि. वाशीम) मार्गे संभाजीनगर–पुणे दिशेने जात असताना ताब्यात घेण्यात आला. आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे शोध मोहिम आव्हानात्मक होती, तरीही अवघ्या दोन तासांत पोलिसांनी त्यास गजाआड केले.


ही कारवाई  पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


या संयुक्त कारवाईत पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे, PSI अभिषेक नवघरे, PSI गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, चालक मनीष ठाकरे, नामदेव मोरे,  नागसेन वानखडे,  गजानन काळे,  प्रदीप धामणे,  नागेश दांदी,  नरहरी देवकते, भूषण मुखमले, भागवत गांजवे,  मयूर खडसे,  नजीर हुसैन,  गणेश जानोरकर आदींचा सहभाग होता.


टिप्पण्या