नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात यंदा सोमवार, २२ सप्टेंबर रोजी होत आहे. अकोला पुरोहित संघाने सभा घेवून घटस्थापना व पूजनाचे शास्त्रोक्त मुहूर्त निश्चित केले.
घटस्थापना व पूजनाचे मुहूर्त (२२ सप्टेंबर २०२५)
अमृत मुहूर्त : सकाळी ०६:०४ ते ०७:३४
शुभ मुहूर्त : सकाळी ०९:०५ ते १०:३६
अभिजीत मुहूर्त : सकाळी ११:४३ ते १२:३०
चंचल मुहूर्त : दुपारी ०१:३७ ते ०३:०७
लाभ मुहूर्त : दुपारी ०३:०७ ते ०४:३८
अमृत मुहूर्त : सायंकाळी ०४:३८ ते ०६:०९
राहुकाल नवरात्र पूजेसाठी प्रभावहीन मानला जातो.
नवरात्र २०२५ : नऊ दिवसांची देवींची रूपे
शैलपुत्री पूजन
ब्रह्मचारिणी पूजन
चंद्रघंटा पूजन
कूष्मांडा पूजन
स्कंदमाता पूजन
कात्यायनी पूजन
कालरात्रि पूजन
महागौरी पूजन
सिद्धिदात्री पूजन , दुर्गा अष्टमी
महानवमी
विजयादशमी (दसरा)
सायंकाळी विजय उत्सव साजरा करण्यात येतो.
विजया दशमीचे महत्त्व
file image
विजयादशमीला श्रीरामांनी रावणाचा पराभव करून धर्माचा विजय साधला. या दिवशी शस्त्रपूजन, सीमोल्लंघन व सोने (आपट्याची पाने) वाटप करण्याची प्रथा आहे. शक्ती, विजय व सद्गुणांचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
उत्सवाचे महत्त्व
file image
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गेच्या आराधनेचा पर्व असून नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. शेवटी विजयादशमी हा दुष्टांवर सद्गुणांचा विजय साजरा करणारा सोहळा असतो. उत्सव दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे, मंदिरे व घराघरांत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा