election-2025-prabhag-rachna: प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 3 हरकती दाखल




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांची नव्याने आखणी करण्यात आली आहे. यासाठी दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत कालमर्यादा देण्यात आली आहे.


या अनुषंगाने आजपर्यंत (दि. 8 सप्टेंबर 2025) प्रारूप रचनेवर एकूण 3 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती अनुक्रमे प्रभाग क्र. 1, 7 आणि 13 अंतर्गत दाखल झाल्या आहेत.



प्रभागानुसार हरकती


प्रभाग क्र. 1 

दुर्गा नगर, नाना नगर आणि गजानन नगर या भागांचा प्रारूप प्रभागात समावेश करण्यात आला आहे. या समावेशाविरोधात हरकत दाखल केली असून सदर भाग पूर्वीप्रमाणे वेगळा ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.



प्रभाग क्र. 7 

तारफैल विजय नगर परिसरात प्रभाग रचनेत बदल करण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. रेल्वे भोगद्यापासून रवी कांबळे यांच्या घरासमोरून शहीद चंद्रशेखर आझाद माळीपुरा चौकापर्यंत सरळ रेषेत सीमा आखावी, अशी सूचना करण्यात आली आहे.



प्रभाग क्र. 13 

EV क्र. 08 शिवरचा भाग सध्या प्रभाग क्र. 13 मध्ये दाखविण्यात आला आहे. मात्र, हा भाग प्रत्यक्षात प्रभाग क्र. 14 शी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला असल्यामुळे तो प्रभाग क्र. 14 मध्ये समाविष्ट करावा, अशी हरकत नोंदवली आहे.





अंतिम मुदत


महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 15 सप्टेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर प्राप्त हरकतींवर विचार करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.








टिप्पण्या