crime-theft-case-exposed-: अकोला खदान पोलिसांची मोठी कामगिरी : 5.86 लाखांच्या चोरीचा उलगडा, दोन आरोपींना अटक

चोरी प्रकरण उघडकीस : खदान पोलिसांची मोठी कामगिरी


नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात खदान पोलिसांनी अल्पावधीत मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईक्स्ट्रा कार्ड कंपनीने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की त्यांच्या गोदामातून तब्बल ४५८ पार्सल चोरीला गेले असून त्याची एकूण किंमत सुमारे ५ लाख ८६ हजार ३३२ रुपये इतकी आहे.


या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने कसून तपास करून संशयित आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान वाशिम बायपास निवासी शादाब अहमद अनीस अहमद व भागतवाडी निवासी मोहसीन खान पीर खान यांना अटक करण्यात आली.


दोन्ही आरोपींच्या ताब्यातून ८ मोबाईल, एक दुचाकी वाहन व २ लाख ७५ हजार ४३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा तायडे तसेच कर्मचारी राहुल सानप, स्वप्नील दामोदर, निलेश खंडारे, अमित दुबे, गिरीश वीर, अभिमन्यू सदाशिव व वैभव कस्तुरे यांनी ही कारवाई केली.


खदान पोलिसांच्या या जलद व यशस्वी तपासामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अकोला पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलून कायद्याचा धाक निर्माण केला आहे.

टिप्पण्या