city-crime-smuggling-of-gutka: पान मसाला दुकानाच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; आरोपीची निर्दोष सुटका, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

       Adv. Kamal Aanandani 



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पान मसाल्याच्या दुकानाच्या नावाखाली गुटख्याची तस्करी केली जात आहे. अशी माहिती अन्न आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकून हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला. अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला सोडून देण्याचे आदेश दिले.


८ डिसेंबर २०१२ रोजी अन्न आणि औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकर यांना मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या ओम जनरल पान मसाला दुकानातून गुटखा विकला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर, अधिकाऱ्याने त्यांच्या सहकाऱ्यासह दुकानावर छापा टाकला आणि त्याची तपासणी केली. तपासादरम्यान, अधिकाऱ्याने दुकानातून १२,८४४ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला. दुकानाचा पंचनामा केल्यानंतर अधिकाऱ्याने दुकान मालक गजानन अग्रवाल यांच्याविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 328,188, 273 व कलम 26(2) 27(3) 30(2)(ब) अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 



सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राहुल ए. शिंदे यांच्या न्यायालयात झाली. आरोपीच्या वतीने वकील कमल आनंदानी आणि दर्शना आनंदानी यांनी बाजू मांडली. आरोपीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी त्यांच्या आशिलावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचा युक्तिवाद केला, याशिवाय, त्यांचा अशिलाबाबत कथित बंदी घातलेला पदार्थ विकत असल्याची कोणतीही तक्रार नव्हती. सरकारी बाजूने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला संशयाचा फायदा देत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

टिप्पण्या