cheque-bounce-case-in-Mah: अकोला न्यायालयाचा निर्णय : आरोपी महिलेस 60 हजाराचा दंड व साधा कारावासाची शिक्षा

 फिर्यादी तर्फे वकील विद्याधर सरकटे



ठळक मुद्दा

अकोला न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणात आशा स्वयंसेविकेस दोषी ठरवत ६०,००० रुपयांचा दंड व ३ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा आणि दंड न भरल्यास १५ दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: फिर्यादीकडून उसने घेतलेले पैसे परत न केल्यामुळे, तसेच दिलेला चेक अपुरा निधीमुळे बाउन्स झाल्याने अकोला न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवत ६०,००० रुपयांचा दंड व तीन दिवसांचा साधा कारावास आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास सुनावला. तसेच नुकसान भरपाई म्हणून ही संपूर्ण रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले. आरोपी महिला ही आशा स्वयंसेविका म्हणून कार्य करते.


प्रकरणाचा तपशील


फिर्यादी गजानन रामभाऊ गोलाईत (रा. जुने शहर, अकोला) यांच्याकडून आरोपी महिलेने, जी आशा स्वयंसेविका आहे, वैयक्तिक कामासाठी १६ जुलै २०१८ रोजी ४०,००० रुपये उसने घेतले होते. यामध्ये १०,००० रुपये रोख आणि ३०,००० रुपयांचा चेक देण्यात आला होता. आरोपीने रक्कम तात्काळ परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीर्घकाळ रक्कम परत न केल्याने फिर्यादीने वारंवार मागणी केली.


शेवटी, आरोपीने ११ जून २०२४ रोजी ४०,००० रुपयांचा चेक दिला. हा चेक पंजाब नॅशनल बँकेत सादर केल्यावर "पुरेशा निधी अभावी परत" असा शिक्का मारून बँकेने परत पाठविला.


कायदेशीर कारवाई


यानंतर फिर्यादीने २४ जून २०२४ रोजी ॲड. विद्याधर सरकटे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली. तरीसुद्धा आरोपीने रक्कम दिली नाही. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि बँक अधिकाऱ्यांचा पुरावा नोंदविण्यात आला. आरोपीकडून बचावाचा पुरावा मांडण्यात आला.


दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांनी आरोपीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट कलम 138 (पराक्रम्य लेख अधिनियम) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले. निकालात आरोपीस ६०,००० रुपयांचा दंड आणि ३ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा. आणि दंड न भरल्यास १५ दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालयाने हा दंड फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.


निकालाचे महत्त्व


हा निकाल न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण संदेश मानला जात आहे. चेक बाउन्स प्रकरणांमध्ये न्यायालय गंभीरतेने निर्णय घेत असून, पैशांच्या व्यवहारात निष्काळजीपणा करणाऱ्यांना शिक्षा मिळणार हे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणात फिर्यादीची बाजू ॲड. विद्याधर सरकटे यांनी सक्षमपणे मांडली.



     ……………………….


अकोला न्यायालय निर्णय, 

आशा स्वयंसेविका दंड, 

चेक बाउन्स प्रकरण, 

Negotiable Instrument Act section 138, 

अकोला कोर्ट बातमी, 

फिर्यादी गजानन गोलाईत, 

ॲड. विद्याधर सरकटे, 

court news akola, 

cheque bounce case in Maharashtra

अकोला न्यायालयाचा निकाल  

आशा स्वयंसेविकेस दंड व शिक्षा

आरोपी महिलेस दंड व कारावास

  …………………………

टिप्पण्या