ambashi-murder-case-patur-police-action: अंबाशीतील खून प्रकरणाचा पातुर पोलिसांकडून फक्त एका तासात छडा; आरोपींना अटक



ठळक मुद्दे

ग्राम अंबाशी (ता. पातुर) येथे नागेश गोपनारायण याचा खून

मद्यधुंद अवस्थेत पत्नी व मेहुण्यांना शोधण्यासाठी आला होता मृत

मेहुण्याच्या मुलाने लाकूड व धारदार हत्याराने डोक्यावर वार करून केला खून

पोलिसांची गुप्त बातमीदारांच्या मदतीने फक्त एका तासात आरोपींवर पकड

तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली; गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू


नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ग्राम अंबाशी (ता. पातुर) येथे आज (१० सप्टेंबर रोजी) दुपारी घडलेल्या खुनाच्या प्रकरणाचा पातुर पोलिसांनी अवघ्या एका तासात छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

मृताचे नाव नागेश पायरूजी गोपनारायण (वय ४०, रा. कानशिवणी) असे असून तो दारू प्यायलेल्या अवस्थेत आपल्या मोठ्या मेहुणीच्या घरी आला होता. सहा महिन्यांपासून पत्नी वेगळी राहत असल्याने तो तिच्याविषयी चौकशी करू लागला. या वादातून त्याने मोठी व लहान मेहुणीला मारहाण केली. त्यावेळी मोठ्या मेहुणीचा मुलगा पुढे आला व संतापाच्या भरात त्याने जवळच पडलेल्या लाकडाने व धारदार हत्याराने नागेशच्या डोक्यावर व पाठीवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या नागेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी धावले. मात्र आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने अंबाशी व आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवली. 


केवळ एका तासात आरोपींना ताब्यात घेण्यात आले


1. सिद्धार्थ शांताराम चोटमल (वय २२, रा. अंबाशी)

2. रेखा शांताराम चोटमल (वय ४५, रा. अंबाशी)

3. नंदा दिलीप डोंगरे (वय ४०, रा. मलकापूर)


तिघा आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड व त्यांच्या पथकाने केली.


टिप्पण्या