akola-tourist-nepal-kathmandu: नेपाळमधील अराजकतेत अकोल्यातील 10 पर्यटक अडकले; सर्वजण सुखरूप


पोखरा व काठमांडू येथे थांबलेले सर्व पर्यटक सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाचा दिलासा


ठळक मुद्दे


नेपाळमधील अराजकतेत अकोल्यातील 10 पर्यटक अडकले.


पोखरा येथील 5 पर्यटक सुरक्षितपणे भारतासाठी रवाना.


काठमांडूतील उर्वरित 5 जण आज परतणार.


सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाची खात्री

कुटुंबीयांनी काळजी न करण्याचे आवाहन.



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय पर्यटक अडकले आहेत. यात अकोल्यातील दहा पर्यटकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्वजण सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


यापैकी पाच पर्यटक पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित थांबले असून, उर्वरित पाच पर्यटक काठमांडू येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. काठमांडूमध्ये असलेले पर्यटक राजेश निनाले यांनी व्हिडिओ संदेश पाठवून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत माहिती दिली असून, नेपाळमध्ये हळूहळू जनजीवन सुरळीत होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, पोखरा येथील पाच पर्यटक बुधवारी रात्री भारतासाठी रवाना झाले असून, काठमांडू येथील उर्वरित पाचही पर्यटक आज भारतासाठी परतणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.


आपत्ती व्यवस्थापन विभागाने दहाही जण सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, असे आवाहन केले आहे.



“आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे. कुटुंबीयांनी काळजी करू नये.”

राजेश निनाले, पर्यटक 





टिप्पण्या