नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने यंदा एक आगळावेगळा पराक्रम करून दाखवला आहे. नेहमी जीव वाचवण्याचे कार्य करणाऱ्या या पथकाने यावेळी मोबाईलचा रेस्क्यू करून दाखवला आहे.
अकोला जिल्ह्यातील येडवण येथे एका व्यक्तीचा एपल कंपनीचा महागडा मोबाईल चक्क 26 फूट खोल विहिरीत पडला. या मोबाईलमध्ये महत्त्वाचा डाटा आणि माहिती असल्यामुळे मालक अक्षरशः अस्वस्थ झाला होता.
मोबाईलचा शोध कार्य प्राण वाचवण्या इतकंच आव्हानात्मक होतं. मात्र, पथकाने तब्बल 24 तास अथक प्रयत्न करून 26 फूट खोल पाण्यातून हा मोबाईल शोधून काढला. विशेष म्हणजे मोबाईलला कुठलीही इजा झाली नसून तो सुरळीत सुरू आहे. मोबाईल परत मिळताच मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या अनोख्या मोहिमेमुळे संत गाडगेबाबा शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थाने, हे पथक आता "प्राण आणि डेटा वाचवणारे" ठरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा