akola-midc-sufiyan-murder-ak: MIDC व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरण: केवळ 12 तासात उलगडा; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील खदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गंभीर प्रकरणात व्यापारी सुफीयान खान याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा साथीदार साजीद खान गंभीर जखमी आहे. फिर्यादी शेहरे आलम यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रेल्वे लाईन बोगदा, मलकापूर येथे चार अनोळखी इसमांनी हल्ला केला. किरकोळ वादातून चाकूने वार करत सुफीयान खान याची निर्घृण हत्या करण्यात आली.





पोलिसांचा श्वास रोखणारा तपास


घटनेनंतर आरोपींचा काहीही पत्ता, CCTV फुटेज वा मोबाईल तपशील उपलब्ध नव्हता.


मात्र स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या २० सदस्यीय पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.


अवघ्या १२ तासांत सहाही आरोपी व मोटारसायकल, कार यांसह ताब्यात घेण्यात आले.






अटक केलेले आरोपी


1. फैजान खान मुर्शरफ खान (रा. हाजी नगर, शिवणी, अकोला)



2. अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, अकोट फाईल, अकोला)



3. शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा. सैयदपुरा, शिवणी, अकोला)



4. शेख अस्लम शेख अकबर (रा. सोलसे प्लॉट, अकोट फाईल, अकोला)



5. सैय्यद शहबाज उर्फ सोनु सैय्यद मुजीब (रा. रामदास मठ, अकोट फाईल, अकोला)



6. एक विधी संगर्षग्रस्त बालक




पोलिसांची चमकदार कामगिरी


ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या देखरेखीखाली, पो.नि. शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली. तपासात विजय चव्हाण, गोपाल ढोले, विष्णु बोडखे, माजीद पठान, फिरोज खान, वसीमोद्दीन, किशोर सोनाने, तसेच २० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.





हा प्रकार फक्त गैरसमजुतीतून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आरोपींना वाटले की, पीडित व्यक्ती व त्याच्या साथीदारांच्या सोबत मुलगी असावी, यामुळे वाद निर्माण होवून, त्यातूनच हत्येचा थरार घडला असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आणखीन आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. 

टिप्पण्या