"आजच अतिक्रमण हटवा, अन्यथा जेसीबीने होईल कारवाई”- मनपा आयुक्त
ठळक मुद्दे
गांधी चौक व चौपाटीवरील अतिक्रमणावर मनपा आयुक्तांची अकस्मात पाहणी.
आज रात्रीपर्यंत अतिक्रमण हटविण्याची ताकीद; अन्यथा जेसीबीने कारवाई.
‘राधिका दही भल्ला’ दुकानावर प्लास्टिक वापरल्याबद्दल ₹5,000 दंड.
मनपा व पोलिस प्रशासनाकडून हॉकर्सना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करण्याची मोहीम सुरू.
कारवाईवेळी वरिष्ठ अधिकारी व स्वच्छता विभागाची टीम उपस्थित.
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने गांधी चौक व चौपाटी परिसरातील अतिक्रमीत व्यावसायिकांना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित केले असतानाही काही दुकानदारांनी दुकानाबाहेर अतिक्रमण केले होते. याची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक चौपाटीवर पाहणी केली.
या पाहणीत दुकानदारांना तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश देत आज रात्रीपर्यंत स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास उद्या सकाळपासून जेसीबीद्वारे ती कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला.
प्लास्टिक ड्रोन वापरल्याबद्दल ५ हजारांचा दंड पाहणी दरम्यान ‘राधिका दही भल्ला’ या दुकानावर प्रतिबंधित प्लास्टिक कोटेड ड्रोन वापरताना आढळून आल्यानंतर मनपाने तत्काळ ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पाहणीवेळी उपस्थित अधिकारी
या कारवाई दरम्यान सहायक आयुक्त विठ्ठल देवकते, विधी अधिकारी शाम ठाकुर, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र तिवारी, स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे, सहायक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, संतोष नायडू, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रौशन अली, स्वच्छता निरीक्षक मो. अलीम, प्रवीण खांबोरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा