akola-city-news-petrol-scam: अकोल्याच्या पेट्रोल पंपावर ‘पाणीदार’ ऑफर! पेट्रोलऐवजी पाण्याने वाहने धावणार?
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, (भारतीय अलंकार न्यूज 24): शहरातील माउंट कॅरमल शाळा चौकातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना एक आगळावेगळा अनुभव आला आहे. '१ लिटर पेट्रोल खरेदी करा आणि अर्धा लिटर पाणी मोफत मिळवा' अशा भन्नाट ऑफरमुळे वाहनधारक गोंधळले आहेत. पेट्रोल भरल्यानंतर काही वाहने सुरूच न झाल्यामुळे तपासणी केली असता, पेट्रोलमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे
'पाणीदार' पेट्रोल:
इंडियन ऑईलच्या पंपावर पेट्रोलमध्ये पाण्याचे मिश्रण आढळल्याचा ग्राहकांचा आरोप.
वाहनचालक हैराण:
पेट्रोल भरल्यानंतर अनेक वाहने सुरू झाली नाहीत, काही वाहनांना तांत्रिक समस्या आल्या.
ग्राहकांचा संताप:
मोठ्या प्रमाणात ग्राहक पंपावर जमा झाले आणि त्यांनी संताप व्यक्त केला.
पंप चालकाचे आश्वासन:
पंप मालकांनी ग्राहकांना वाहने दुरुस्त करून देण्याचे आणि पूर्ण टाकी पेट्रोल भरून देण्याचे आश्वासन दिले.
कंपनीवर कारवाईची मागणी:
या गंभीर चुकीसाठी पेट्रोल कंपनीवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेट्रोलपंप येथे ग्राहकांचा गोंधळ
अकोला शहरातील माउंट कॅरमल शाळा चौकातील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी जमा झाली. नेहमीप्रमाणे आज इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना येथे वेगळाच अनुभव आला. काही ग्राहकांनी पेट्रोल भरल्यानंतर त्यांच्या गाड्या सुरूच झाल्या नाहीत. त्यानंतर पंपावरील इंधन तपासले असता, पेट्रोलमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले.
एका ग्राहकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "आज आम्हाला पेट्रोलसोबत बोनस म्हणून भरपूर पाणी मिळाले. पेट्रोल टाकी फुल्ल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि 'पोहण्याच्या स्विमिंग पूलवर' जास्त धावेल असे वाटते." या प्रकारामुळे अनेक ग्राहकांचे मोठे नुकसान झाले आहे, कारण त्यांच्या वाहनांना तांत्रिक बिघाड झाला आहे.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर पंपावर एकच गोंधळ उडाला. संतप्त ग्राहकांनी पंपावर गर्दी केली आणि व्यवस्थापकाकडे तक्रार केली. व्यवस्थापकांनी ही चूक मान्य केली आणि ग्राहकांची वाहने दुरुस्त करून देण्याचे तसेच त्यांच्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून देण्याचे आश्वासन दिले.
या चुकीमुळे पेट्रोल पंप चालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. त्यांच्या हलगर्जीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता पेट्रोल कंपनी यावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंधनात पाणी मिसळवण्यासारख्या गंभीर बाबींवर कंपन्या आणि प्रशासन कठोर पाऊले उचलतात का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा