भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : तालुक्यातील वखापुर येथील मूळचे व सध्या जुने शहर डाबकी रोडवरील नंदाने मंगल कार्यालयाजवळ वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक, दैनिक अजिंक्य भारतचे मुद्रित शोधक तसेच संभाजी ब्रिगेडचे सक्रिय पदाधिकारी श्री. संतोष तुकाराम गायगोळ (पाटील) यांचे गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 52 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
श्री. गायगोळ यांचे पार्थिवाचे अंत्यसंस्कार शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जुने शहरातील गुलजारपुरा मोक्षधाम येथे करण्यात येणार आहेत.
सर्वांच्या मनात हसतमुख, प्रेमळ व मदतीला तत्पर अशी ओळख निर्माण करणाऱ्या संतोष गायगोळ यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
संतोष पाटील हे अकोल्यातील वृत्तपत्र पत्रकारिता क्षेत्रासह नाट्य,क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकिय क्षेत्राशी जुळलेले होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका वठविल्या होत्या. तसेच ते उत्तम व्हॉलीबॉल, क्रिकेट खेळाडू , क्रीडा शिक्षक होते. महाविद्यालयीन जीवनात ते राजकिय क्षेत्रात सक्रिय होते. तसेच अनेक सामाजिक संस्थांशी ते जुळले होते. याशिवाय उत्तम लेखक आणि शीघ्र कवी होते. दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत येथे त्यांनी पूर्वी मुद्रित शोधक म्हणून सेवा दिली होती.
हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी संतोष गायगोळ पाटील यांना भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ॲड. नीलिमा शिंगणे जगड,
मुख्य संपादक
भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा