kavad-yatra-road-accident-mp: मध्यप्रदेश शिवणी येथे कावड यात्रेवर नियतीचा घाला; भीषण अपघातात पातूर येथील दोन ठार, नऊ जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : मध्य प्रदेशातील शिवणी येथे कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर येथील दोन युवक जागीच ठार झाले तर नऊ गंभीर जखमी झाल्याचे कळते.



शुक्रवारी मध्यरात्री बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चोर गरठिया गावाजवळ भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला व पायी चालणाऱ्या कावडधाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश विजय पोहरे (दोघेही रा. पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



सूत्रांच्या माहितीनुसार, भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


जखमींची नावे 


कुलदीप गाडगे (वय 25)

सतीश तायडे  ( वय 28)

सचिन ढगे 

गौतम उगवे

बंटी सोनोने

विठ्ठल थोरात

पुरुषोत्तम गिऱ्हे 

ऋषी वानखडे


गंगाजल आणण्यासाठी निघाले होते शिवभक्त


उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शिवभक्त असलेले युवक गंगाजल आणण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या मार्गात या भाविकांना ट्रकने धडक दिली आणि दोघांना प्राण गमवावा लागला. 


नागपूरपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील शिवनी येथे ही घटना घडली.  दरम्यान, गंगाजल घेऊन जाणारी कावड यात्रा रात्री महामार्गावरून अकोल्याला परतत होती. वाळूने भरलेला ट्रक कावडच्या मागे धावणाऱ्या ट्रॅक्टरला धडकल्याने हा अपघात झाला, त्यानंतर ट्रॅक्टर उलटून भाविकांवर पडला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर  आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. 


पातूर येथे शोकाकुल वातावरण


दरम्यान, ही कावड अकोल्यातील पातूर शहरातील जय तपे हनुमान व्यायाम शाळा मंडळ उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ म्हणजेच 'देवकुंड' येथे गंगाजल आणण्यासाठी निघाले होते. दरम्यान, गंगाजल आणताना या भाविकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पातूर शहरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.


बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी ⬇️ क्लिक करा 

भीषण अपघात पातूर येथील 2 ठार



टिप्पण्या