honey-trap-murtizapur-news: अकोल्यातील बंटी बबलीचा खंडणीचा कारनामा उघड; सराफा व्यावसायिकाला लाखों रुपयांचा घातला गंडा
ठळक मुद्दे
फिर्यादीकडून महिलेनं मैत्रीचं आमिष दाखवून सुरुवातीला ३ लाख रुपये उकळले.
पती-पत्नीच्या धमक्या सुरूच राहिल्या आणि वेळोवेळी एकूण १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी वसूल केली.
अखेर आरोपींनी पुन्हा ५ लाखांची मागणी केली
पोलिसांनी सापळा रचून १ लाख रुपये स्वीकारताना दाम्पत्याला रंगेहाथ पकडलं.
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सराफा व्यवसायिक असलेल्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून अकोल्यातील टॉवर चौकातील स्टेट बँकेत सुरुवात झालेली ओळख थेट १८ लाखांहून अधिक खंडणी पर्यंत पोहोचली. अखेर पोलिसांनी सापळा रचून खंडणीखोर दाम्पत्याला १ लाख रोख रकमेसह पकडले.
प्रकरणाची सुरुवात कशी झाली?
१६ जून २०२५ रोजी ५१ वर्षीय फिर्यादी बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेले असता, त्यांची भेट एका अनोळखी महिलेशी झाली.
त्या महिलेनं (आरोपी लता नितेश थोप, वय ३०) मोबाईल नंबर घेऊन फिर्यादीशी संपर्क सुरू केला.
पती वाईट वागतो, तुमच्याशी बोलायला आवडतं अशी सहानुभूती मिळवून मैत्रीचा बहाणा केला.
सापळ्यात अडकवण्याचा कट
२ जुलै रोजी फिर्यादी त्या महिलेला भेटायला खरबढोरे (ता. मुर्तिजापूर) येथे गेले.
तेव्हा महिलेचा पती आरोपी नितेश प्रभाकर थोप (वय ३५) अचानक आला.
त्याने दरवाजा बंद करून फिर्यादी आणि त्याच्या पत्नीचे (आरोपी महिला ) फोटो काढले आणि फिर्यादीला धमकी दिली की,“ तू ने माझ्या पत्नीवर जबरदस्ती केली आहेस, हे सगळ्यांना सांगतो, पोलिसात तक्रार करतो.”
त्यानंतर ३ लाखांची मागणी करून, बदनामीच्या भीतीने फिर्यादीने पैसे दिले.
हळूहळू वेळोवेळी एकूण १८,७४,०००/- रुपये खंडणी स्वरूपात उकळले.
पुन्हा पाच लाखांची मागणी
३० ऑगस्ट रोजी फिर्यादीला पुन्हा ५ लाख रुपये देण्याची धमकी दिली.
फिर्यादीकडे फक्त १ लाख रुपये उपलब्ध असल्याने त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांचा सापळा आणि अटक
पोलिसांनी सापळा रचून मुर्तिजापूर- अकोला रोडवरील टोलनाक्यावर आरोपींना १ लाख रुपयांसह रंगेहाथ पकडले.
आरोपींची नावे –
1. लता नितेश थोप (वय ३०)
2. नितेश प्रभाकर थोप (वय ३५), दोघे रा. खरबढोरे.
दोन्ही आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उप निरिक्षक चंदन वानखडे, स.पो.नि. श्रीधर गुठ्ठे करीत आहे.
गुन्ह्याची नोंद
अप.क. २७०/२५
कलम ३०८ (२), ३०८ (६), ३ (५) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल.
…….
Disclaimer
"The above report is based on the information received from police investigation. The accused is presumed innocent until proven guilty in the court of law. The names mentioned are as per the official FIR and are not intended to defame anyone."
डिस्क्लेमर
“वरील माहिती ही पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक तपासावर आधारित असून आरोपी दोषी की निर्दोष हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. बातमीमध्ये नमूद केलेली नावे व माहिती ही फक्त गुन्हा नोंदीसंदर्भात आहे, त्याचा कुणाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा हेतू नाही.”
…….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा