ganeshotsav-2025-satvikfood: गणेशोत्सव 2025: स्वर्णिम धरोहर; ’सात्विक भोजन विरुद्ध जंक फूड’, घरगुती गणेश उत्सवात साकारला सामाजिक संदेशाचा देखावा




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील शास्त्री नगर निवासी शर्मा परिवाराने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या घरगुती गणेश उत्सवात  सामाजिक संदेशाचा देखावा तयार केला आहे. भारतीय अलंकार स्वर्णिम धरोहर ही थीम घेऊन “सात्विक भोजन विरुद्ध जंक फूड" या विषयावर हा देखावा साकारला आहे.विशेषतः हा देखावा किशोर आणि युवा वर्गाने अवश्य पहावा, असा आहे. सात्विक जीवन आणि जेवणाचे फायदे आणि जंक फूड मुळे होणारे नुकसान यावर मोठया कल्पकतेने हा देखावा जन्मजातच कलाकार असलेल्या नीता शर्मा यांनी उभारला आहे.



नीता शर्मा दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या घरी समाजप्रबोधन करणारे देखावे साकारत असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांची उत्सुकता कायम असते. यंदा नीता शर्मा यांनी स्वर्णिम धरोहर थीम वर आधारित "सात्विक जेवण विरुद्ध जंक फूड" हा विषय निवडून एक आगळावेगळा देखावा सादर केला आहे.banews24



या देखाव्यात जुन्या काळातील  स्वयंपाक घरातील भांडी, साहित्य, पारंपरिक आरोग्यदायी पदार्थ यांचे चित्रण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला आधुनिक मॉड्युलर किचनमधून मिळणारे जंक फूड दाखवण्यात आले आहे. यासंदर्भातील साजेसे स्लोगन फलकही येथे लावलेले आहेत. बाळ गणेश आणि माता पार्वतीची सुंदर आकर्षक मूर्ती यात विराजमान आहेत.



सात्विक आहाराच्या तुलनेत जंक फूडमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित करत नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. भारतीय अलंकार न्यूज 24




दरवर्षीप्रमाणे यंदाही या सामाजिक संदेशाने सजवलेल्या देखाव्याला मोठी गर्दी होत असून, भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. BAnews24

टिप्पण्या