ganesh-chaturthi-sthapana-25: गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची स्थापना कोणत्या वेळी करावी; अकोला पुरोहित संघाने केले मार्गदर्शन





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता सर्वत्र आहे.गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची स्थापना कोणत्या वेळी करावी, हा प्रश्न प्रत्येक गणेश भक्ताला पडतो.अकोला पुरोहित संघाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले आहे.



शास्त्रानुसार श्री गणेश ही विघ्नहर्ता मूर्ती आहे, त्यामुळे कोणत्याही विशेष मुहूर्ताची आवश्यकता नसते. तरीदेखील परंपरेनुसार मध्यान्हकाल म्हणजेच दिवसाचा दुसरा प्रहर हा सर्वाधिक शुभ मानला जातो. म्हणूनच, २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटे हा श्री गणेश स्थापनेचा सर्वोत्तम क्षण मानला गेला आहे.


सम्राट पंचांगानुसार शुभ काळ 


लाभ काल – सकाळी ६:०७ ते ७:४०


अमृत काल – सकाळी ७:४० ते ९:१५


शुभ समय – सकाळी १०:५० ते १२:२३


वृश्चिक लग्नातील उत्तम मुहूर्त – ११:५४ ते दुपारी २:०८


चंचल – दुपारी ३:५२ ते ५:०७


संध्याकाळचा लाभ काल – ५:०७ ते ६:४१



महाराष्ट्रीयन पंचांगानुसार चतुर्थी तिथि दुपारी ३:४३ पर्यंतच राहील.

या सर्व वेळा सम्राट पंचांगानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत.


अकोला येथील श्री बालाजी मंदिरात आयोजित सभेत पंडित रजनीकांत जाडा, श्याम सुंदर अवस्थी, आलोक शर्मा, सुमित तिवारी, लाला तिवारी, भैरव शर्मा, विनोद, गोपाल शर्मा, रुपेश शर्मा, प्रमोद तिवारी, रतन तिवारी, तसेच पंडित रवि कुमार शर्मा यांसारखे विद्वान पुरोहित उपस्थित होते.


पुरोहित संघाने सर्व गणेश मंडळांना आवाहन केले आहे की, श्रींच्या मंडपात भक्तिगीत, भजन व कीर्तनांचा अधिकाधिक उपयोग करावा आणि उत्सवाचा आत्मिक आनंद वाढवावा.”




video: श्री गणेश स्थापना सर्वोत्तम मुहूर्त?

टिप्पण्या