creation-of-red-clay-ganesh- idols: पर्यावरणपूरक चळवळीतून लाल माती गणेशमूर्ती निर्मिती; ध्येयाने झपाटलेल्या महिला मूर्तिकार रेवती भांगे

Creation of red clay Ganesh idols through eco-friendly movement; Female sculptor Revati Bhange driven by a goal





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : श्री गणराय लाखो भाविकांचे आराध्यदैवत आहे. सर्व संकटांचा नाश करणार्‍या या देवाला पूजेतही अग्रक्रमाचा मान आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी मंगलमूर्ती श्री गणेश  आगमन होत आहे. महाराष्ट्रात घरोघरी श्री गणेशाची श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमूळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढतो आहे. अनेक मूर्तिकार जनजागृतीचे उद्दिष्ट समोर ठेवून पाण्यात टाकताच सहज विरघळणार्‍या तसेच पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या सुबक, आकर्षक श्रींच्या मूर्तीं घडवितात. पर्यावरण चळवळीचा हा प्रवास गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. अकोल्यातही अशाच ध्येयाने झपाटलेल्या लाल मातीतून देवी देवतांच्या व इतर मूर्ती घडविणाऱ्या महिला मूर्तिकार आहेत, रेवती भांगे असं त्यांचं नाव.  


स्थानिक बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून रेवती भांगे यांनी 2017 साली 'डीपीएड' (फाइन आर्ट) कला शिक्षण पूर्ण केले असून, छंदाला व्यावसायिकतेची जोड दिली. 




शहरातील अनेक संस्था, संघटनांकडून गणेशोत्सव पर्वात लाल माती शाळा महाविद्यालयांमध्ये लाल मातीचे गणेशमूर्ती निर्मिती करून त्या मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीसाठी पर्यावरणपूर्वक चळवळ राबवित कार्यशाळा घेत आहेत. अशातच रेवती भांगे ह्या लाल मातीपासून गणपती बाप्पांच्या आकर्षक मुर्तींची निर्मीती करीत आहेत.


 


ध्यास पर्यावरण चळवळीचा, 30 हजार बियांचे वितरण!



भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचे आगमन होते. या सणांना घरोघरी उत्सवाचे स्वरूप असते. या उत्सव काळात अकोल्याच्या रेवती भांगे अर्ध्या फुटापासून जवळपास दोन फुटापर्यंत आकाराच्या मोजक्या पण लक्षवेधी मूर्ती विलक्षण तन्मयतेने घडवितात. यासोबतच  रेवती भांगे या पर्यावरण चळवळ देखील राबवित आहेत. मागील 8 वर्षांपासून त्यांचा हा पर्यावरण चळवळीचा प्रवास सुरू असून जवळपास 30 हजार ’लिली’ फुलांच्या बियांचेही त्या दरवेळी वितरण करतात.





रेवती भांगे या प्रसिद्ध छायाचित्रकार नीरज भांगे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.



बातमीचा व्हिडिओ ⬇️ येथे पहावा

पर्यावरणपूरक गणेश उत्सव; रेवती भांगे यांचा उपक्रम


टिप्पण्या