corruption-case-edu-landscam: भारतीय सेवा सदन संस्थेतील भ्रष्टाचार चौकशीसाठी रिपाइं (आठवले) चे अकोल्यात लाक्षणिक उपोषण






ठळक मुद्दा

आर.डी.जी. महिला कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात रिपाइंचे आंदोलन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : भारतीय सेवा सदन (आर.डी.जी. महिला कॉलेज) या शैक्षणिक संस्थेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रिपाइं (आठवले) तर्फे आज गुरुवार 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.


रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संस्थेच्या संचालक मंडळात गोयनका कुटुंबातीलच अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच शासनाने शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या 27 एकर जमिनीचा व्यापारी वापर होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.


या संदर्भात शासनाने नमूद भूखंड शासन जमा करून, संस्थेवर कलम 41 ड नुसार प्रशासक नेमावा, अशी मागणी करण्यात आली.


या आंदोलनास जिल्ह्यातील रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने जिल्हा महासचिव आशिष शिरसाट, युवक जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण गोपनारायण, पातूर तालुका अध्यक्ष पंडित सरदार, अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे, तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात, अकोला तालुका अध्यक्ष शुभम तायडे, तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.



या उपोषणाची शासनाने दखल घेतली असून, अकोला धर्मदाय उपआयुक्त कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे लेखी पत्र दिले आहे. तसेच उपोषणकर्ते सुनील अवचार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.



यांचा मिळाला पाठिंबा

रिपाइं अकोला जिल्हा महासचिव  आशिष शिरसाट, युवक जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण गोपनारायण, पातूर तालुका अध्यक्ष पंडित सरदार, देवेंद्र सरदार, विष्णू तायडे, अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर, तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात, भीमराव तायडे, दिलीप थोरात, सागर जामानिक, निखिल शिरसाट, गजानन शेगोकार, अकोला तालुका अध्यक्ष शुभम तायडे, शे. अन्सार कुरेशी, मंगेश शेगोकार, जानराव माने, काशीराम तायडे, दीपक गांगरे, शंकर राठोड, शालिग्राम पायधन, समाधान नावकार, राम पवार, प्रज्ञदीप थोरात, अश्विन इंगळे, श्रावण सोनोने, मनीष सरदार, संकेत सरदार कोकिळा ताई जंजाळ, सुनंदाताई चांदुरकर, ज्योतीताई आळणे, रजनीताई माहोरे सुशमाताई माहोरे, संध्याताई निकम, मीनाताई दामोदर, उज्वला इंगळे, पद्मिनी इंगळे, मंगळाबाई डाबेराव, केशरबाई इंगळे, सविता सोनोने, मंगला गवई, शोभा अढाऊ, सविता डिक्कर, आशा  तायडे, शोभा राठोड, पुष्पा राठोड, गीता जाधव, तुळसबाई सोळंके, इत्यादी पदाधिकारी आणि महिला यांनी उपस्थिती दाखवून उपोषणास पाठिंबा दिला.





टिप्पण्या