- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
conspiracy-to-allocate-TDR-: फ्लड झोनमधील जागा आरक्षणाखाली टाकून TDR वाटपाचा कट ? सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांचा गंभीर आरोप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला शहरलगतच्या खडकी बुद्रुक येथील सर्वे नंबर 29/2 मधील आरक्षित जागेवर TDR (Transferable Development Rights) देण्यासंदर्भात महापालिकेने जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. मात्र यावर सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी गंभीर आरोप करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
यासंदर्भात आज विजय मालोकर यांनी पत्रकार परिषद आमंत्रित करुन याबाबत सविस्तर माहिती देत गंभीर मुद्दे उपास्थित केले.
महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 328 आणि 371 अंतर्भूत करताना कलम 26 अंतर्गत प्रसिद्धी देण्यात आली होती. मात्र, नियोजन प्राधिकरणाला या जागेची गरज नसतानाही काही ठराविक लोकांचा फायदा व्हावा म्हणून महापालिका प्रशासनाने हेतूपुरस्सरपणे या जागा आरक्षणाखाली आणल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे.
आर्थिक व्यवहारांचाही केला आरोप
विकास आराखड्यात बदल करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून, शासनाची दिशाभूल केल्याचेही ते म्हणाले. फ्लड झोनमध्ये येणारी ही जमीन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता नदीपात्रात असल्याचे स्पष्ट होते. तरीही या जमिनीला आरक्षणाखाली टाकून आणि त्यासाठी TDR वाटप करून भूमाफियांना फायदा पोहोचवण्याचा कट रचण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरक्षण क्रमांक 328 आणि 371 संदर्भात प्रश्नचिन्ह
आरक्षण क्र. 328 - येथे महापालिकेकडून चार्जिंग बस स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे.
आरक्षण क्र. 371 - हे खेळाचे मैदान असल्याचे सांगण्यात आले असून, ते सुद्धा नदीपात्रात असल्याने त्यामागे कोणाचा फायदा आहे हे स्पष्ट असल्याचे मालोकार यांनी सांगितले.
मागणी आणि इशारा
विजय मालोकार यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, वरील आरक्षणे रद्द करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, फ्लड झोनमधील जमिनींना मूळ मूल्यापेक्षा जास्त मोबदला मिळवून देऊन शासनाची लूट करणाऱ्यांचा व त्यामागे असलेल्या लोकांचा लवकरच भांडाफोड करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे प्रकरण आता अधिक गाजण्याची शक्यता असून, महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
allegation
allocate TDR
conspiracy
flood zones
putting land
reservation
social activist
Vijay Malokar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा