ठळक मुद्दा
भौरदच्या पुलावरून गायगाव डेपोला जात असलेला टँकर पुलावरून पाण्यात पडला. टँकर चालक व त्याचा सहकारी दोघंही सुरक्षित आहेत.
भौरद गावाजवळील पुलावर मोठा अपघात
पुलावरील पाण्यातून मार्ग काढताना टँकर पलटला
पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प
नीलिमा शिंगणे जगड
अकोला - गायगाव रस्त्यावरील भौरद गावाजवळील पुलावर आज मोठा अपघात घडला. पुलावरील पाण्यातून मार्ग काढत असताना एक टँकर नियंत्रण सुटल्याने पलटला. या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
टँकरमध्ये नेमके किती लोक होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, अपघात गंभीर असल्याने जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.चालकाचा अतिउत्साही जीवघेणा प्रवास अखेर अपघाताला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी जमली आहे.
आताच हाती आलेल्या वृत्तानुसार, या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पलटी झालेल्या वाहनाचा क्रमांक: MH 26 AD 2131 असून, वाहन मालक/ड्रायव्हरचे नाव गणेश अहंकारे व त्यांचे सोबत विजय अमरतवार होते.
हा रिकामा डिझेल टँकर नांदेड कडून गायगावकडे डिझेल भरण्यासाठी जात होता. दरम्यान जोरदार पाऊस सुरू असताना भौरद, डाबकी पुलाजवळ पाणी वाहत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर नाल्यात पडला. यावेळी डाबकी गावातील तरुणांनी दोराच्या सहाय्याने टँकर चालक व वाहक दोघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र टँकर सध्या पुराच्या पाण्यात पडलेला आहे.
दरम्यान, या मार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली असून, ओढ्याचा पुल ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. दोन्ही बाजूने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस तैनात करण्यात आले असून असल्याची माहिती उपविभागीय शहर पोलीस उप अधीक्षक सतीश कुळकर्णी यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा