नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र सरकारच्या कृषीविषयक अपयशाचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मुर्तीजापूर तहसील कार्यालयावर काळा बैल पोळा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काळा बैल पोळ्याचे प्रतीकात्मक आयोजन करून शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली.
मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे आपल्या मागण्यांचा पाढा वाचला. आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने लागू करावी, अशी मागणी केली. राज्यभर झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि हवामानातील अस्थिरतेमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ द्यावी, असा ठाम सूर शेतकऱ्यांनी लावला.
याशिवाय, शासनाने अलीकडेच रद्द केलेल्या पीकविमा योजनेचे नियम रब्बी हंगाम २०२५ पर्यंत पूर्ववत करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच २०२२ ते २०२४ दरम्यानचा थकीत पीकविमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा, असेही शेतकरी संघटनेचे म्हणणे होते.
फक्त नुकसानभरपाई किंवा विमा योजनेपुरतेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळावा, यासाठीही आंदोलनकर्त्यांनी ठोस मागण्या केल्या. विशेषतः कापूस व तूर यांना १०,००० रुपये प्रति क्विंटल, तर सोयाबीन व हरभरा यांना ८,००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, असे संघटनेचे मत मांडण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याऐवजी शासनाने वारंवार फसवणूक केली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. "कर्जमाफी द्या", "पीकविमा द्या", "हमीभाव मिळाला पाहिजे" अशा घोषणा देत शेतकरी संताप व्यक्त करत होते. काळ्या बैलाची पूजा करून प्रतीकात्मक "काळा बैल पोळा" साजरा करण्यात आला. या अनोख्या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधून घेतले.
शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर करत आपल्या सर्व मागण्या नमूद केल्या. मागण्या न मानल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न दुर्लक्षिला तर सरकारला रस्त्यावर उतरून उत्तर द्यावे लागेल. आता शेतकरी शांत बसणार नाही.
या आंदोलनामुळे मुर्तीजापूर शहरात दिवसभर शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता होती. प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
संपूर्ण आंदोलनानंतर तहसील कार्यालयासमोर ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Farmers’ Black Bull Pola Protest in Murtizapur: Strong Message to Government
In a sharp demonstration against what they termed the “failure of the Maharashtra government’s agricultural policies,” members of the Krantikari Shetkari Sanghatana staged a unique protest at the Murtizapur tehsil office on Friday. Marking the day with a symbolic “Black Bull Pola” celebration, farmers gathered in large numbers, chanting slogans and voicing strong demands.
At the forefront of their demands was a call for complete loan waiver for all farmers. They also sought recognition of the widespread damage caused by unseasonal rains and climatic instability, urging the state to declare a wet drought and provide ₹50,000 per hectare as immediate financial assistance.
Another major issue raised was the rollback of changes in the crop insurance scheme. Protesters insisted that the government reinstate the earlier scheme until the 2025 rabi season and immediately deposit pending crop insurance installments from 2022 to 2024 into farmers’ accounts.
The demand for guaranteed prices also dominated the protest. Farmers pressed for ₹10,000 per quintal for cotton and tur, and ₹8,000 per quintal for soybean and chickpea. They alleged that existing policies have left cultivators vulnerable to exploitation and losses.
The unusual act of celebrating a “Black Bull Pola” drew public attention. Farmers performed rituals with the bull while shouting slogans such as “Loan waiver now,” “Insurance now,” and “Fair prices for crops.”
Later, representatives submitted a memorandum to the tehsildar, warning that if their demands were not met promptly, they would escalate the agitation across the state. Police presence was maintained to prevent any untoward incidents, while the protest created a charged atmosphere in Murtizapur throughout the day.
The protest underlined farmers’ growing impatience and signaled that unless the government addresses their concerns, larger and more intense agitations could follow.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा