akola-municipal-corporation-: मनपा उपायुक्‍त (विकास) पदाचा कार्यभार विजय पारतवार यांचेकडे




Vijay Paratwar takes charge of the post of Municipal Deputy Commissioner (Development)


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिकेचे महसुली उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत निर्मिती करणे, वसुलीचे उद्दीष्‍ट पुर्ण करणे, महानगरपालिकेच्‍या विविध विभागाकडून महसूल उत्‍पन्‍न  वाढविण्‍याकरीता प्रभाववीपणे उपाययोजना करून त्‍यांची उंमल बजावणी करणे, महानगरपालिका अंतर्गत असलेल्‍या विविध विभागाचे दैनंदिन कामकाजामध्‍ये सुसुत्रता, पारदर्शकता व गतिशीलता आणण्‍याकरिता, या विभागांतर्गत लोकाभिमुक सेवांची अंमलबजावणी तातडीने व्‍हावी याकरिता मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये कर अधिक्षक विजय पारतवार यांचेकडे उपायुक्‍त (विकास) या पदाचा कार्यभार सोपविण्‍यात आले असून त्‍यांचे कडे शिक्षण विभाग, जन्‍म-मृत्‍यु व वि‍वाह नोंदणी विभाग, वैद्यकीय आरोग्‍य व मलेरिया विभाग, म्‍ध्‍यवर्ती भांडार विभाग, पर्यावरण संवर्धन व उद्यान विभाग, समाज कल्‍याण व विकास विभाग, दीनदयाल अंत्‍योदय योजना, अभिलेखा विभाग, संगणक/माहिती तंत्रज्ञान (IT), अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन बाबात कार्यवाही करणे, या विभागाची प्रशासकीय जबाबदारी सो‍पविण्‍यात आली आहे.




मनपा आयुक्‍त डॉ.लहाने यांनी घेतला टॅक्‍स वसुलीचा आढावा


Municipal Commissioner Dr. Lahane reviewed tax collection



आज दि. 6 ऑगस्‍ट 2025 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍याव्‍दारे अकोला महानगरपाकेच्‍या डॉ.बाबासाहेब मुख्‍य सभागृह येथे मालमत्‍ता कर विभागाची कर वसुली बाबत आढावा बैठक घेतली.


          

या बैठकीत सर्वप्रथम मनपा आयुक्‍त यांनी आजपर्यंत करण्‍यात आलेल्‍या मालमत्‍ता कर वसुली बाबतचा आढावा घेतला. तसेच यावेळी, जास्‍त प्रमाणात थकबाकी असलेल्‍या मालमत्‍ता  धारकांकडे भेटी देऊन थकित कराची वसुली करणे, जे मालमत्‍ता धारक भेटी देऊनही थकित कराचा भरणा करत नाही अशा मालमत्‍ता धारकांवर नियामानुसार कार्यवाही करणे, तसेच महानगरपालिकेचा उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने मालमत्‍ता कर हे मुख्‍य स्‍त्रोत असून मनपाच्‍या उत्‍पन्‍नात वाढ व्‍हावी याकरिता शहरात नवीन बनलेल्‍या इमारतींवर कर आकारणी करणे आदींबाबत सुचना दिल्‍या, तसेच ज्‍या कर वसुली लिपिंकांची मालमत्‍ता कर वसुली समाधान कारक होणार नाही अशा कर वसुली लिपिंकांवर नियमानुसार कार्यवाही प्रस्‍तावीत करण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी मनपा आयुक्‍त डॉ.लहाने यांनी सांगितले.


          

या बैठकीत मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे, विजय पारतवार, सहा.आयुक्‍त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, राजेश सरप, सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, अविनाश वासनिक, रमाकांत बगरेट, तारिक अहमद, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, आय.टी.‍विभागाचे सिस्‍टीम मॅनेजर हीरा मानकर, प्रमुख सहाय्यक नंदीनी दामोदर, स्‍थापत्‍य  कंसलटंसी प्रा.लि.अमरावतीचे अमोल डोईफोडे यांचेसह सर्व कर वसुली लिपिंकाची उपस्थिती होती.





अनाधिकृत बॅनरवर मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई


The Municipal Corporation Encroachment Department takes action against unauthorized banners.


दि. 5 ऑगस्‍ट 2025 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका पश्चिम झोन अंतर्गत जयहिंद चौकातील बिना परवानगीने लावण्‍यात आलेले बॅनरवर मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे. तसेच नेकलेस रोडवरील अतिक्रमणे काढण्‍याची कारवाई करण्‍यात आली.  


     

     

या कारवाईत सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांचेसह मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांचा समावेश होता.

टिप्पण्या