- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-midc-murder-case-news: एम.आय.डी.सी. खून प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; किरकोळ वादातून घडलं हत्याकांड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
अकोला सत्र न्यायालयाचा निर्णय: आरोपी सुनिल पालवे दोषी ठरला; पाच हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला न्यायालयात आज ऐतिहासिक निर्णय दिला असून, किरकोळ वादातून घडलेल्या खुनाला पाच वर्षांनी न्यायालयीन उत्तर मिळाले. एम.आय.डी.सी. खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावून न्यायालयाने समाजात कठोर संदेश पोहचविला आहे.
अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने एम.आय.डी.सी. परिसरात घडलेल्या खून प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए.डी. क्षीरसागर यांनी सत्र खटला क्र. २५४/२०११, अपराध क्र. १६२/२०१९ मध्ये आरोपी सुनिल श्रीचंद पालवे (३१, रा. ता. खकनार, जि. बुरहानपूर, म.प्र.) यास कलम ३०२ भा.द.वि. अंतर्गत आजीवन कारावास तसेच ५,००० रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची कैदेची शिक्षा ठोठावली.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, आरोपी सुनिल पालवे हा आपल्या मित्रांसह सुरजदेव दालमिल, एम.आय.डी.सी. अकोला येथे मजुरीचे काम करत होता. तो आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथील एका खोलीत राहात असे. दिनांक ०४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री जेवणाच्या वेळी आरोपीचा त्याचा सहकारी राजु शंकरलाल जांभेकर याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने हाताशी आलेल्या लाकडी पोळपाटाने राजुच्या डोक्यात प्रहार केला. यात राजु गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार प्रभु छोटेलाल गौतम होता.
या प्रकरणाची फिर्याद एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीकृष्ण रामदास पाटील यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्ष व पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला राजु जांभेकर यांच्या खुनाबाबत जबाबदार धरले.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. तर एम.आय.डी.सी. पो.स्टे. पैरवी श्रीमती महल्ले आणि ए.एस.आय. एफ. आर. काझी यांनी सहाय्य केले.
Akola Court Crime News
Akola crime
Court Speaks
justice
life imprisonment
MIDC Murder Case
MIDC Murder Verdict
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा