akola-kawad-yatra-accident: अकोल्यातील कावड यात्रेत भीषण दुर्घटना: 20 जण जखमी; आमदार रणधीर सावरकर , विजय अग्रवाल यांची तत्परता




नीलिमा शिंगणे जगड

अकोला : गांधीग्रामच्या दिशेने रवाना झालेल्या डाबकी रोड वासी शिवभक्त मंडळाच्या कावड यात्रेतील ट्रॅक्टर ट्रॉली रविवारी रात्री दगडीपुल जवळ उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात सुमारे 15 ते 20 शिवभक्त युवक जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.


प्राप्त माहितीनुसार कावड यात्रेतील सर्वात मोठी कावड म्हणून प्रसिद्ध असलेली डाबकी रोडवासी कावड मंडळ वाघोली गांधीग्रामकडे निघाला होता. दरम्यान भीम नगर चौक गुलजारपूरा येथे निसरडा रस्ता असल्यामुळे ट्रॅक्टर दगडी पुलावर जावून आदळला. यामध्ये ट्रॉली मधे असलेले युवक जखमी झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. पोलिसांनी व स्थानिक युवकांनी लगेच जखमी युवकांना दवाखान्यात उपचारार्थ भरती केले.



घटनेची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी तत्परतेने घटनास्थळी लक्ष घातले व जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी GMCH चे अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना आवश्यक निर्देश दिले. त्यांनी जखमींना औषधोपचार तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही आदेश दिले.


दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजप नेते विजय अग्रवाल यांच्यासह विलास शेळके, वैशाली शेळके, सतीश ढगे, जयंत मसने यांनी तातडीने रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली.




या दुर्घटनेत जखमी झालेले काही युवकांची नावे – (सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार)




 🔹 अंकित ढोले

 🔹 शुभम कडू

 🔹 विश्वजीत महले

 🔹 प्रतीक काशीद

 🔹 ऋषी गावंडे

 🔹 यश बडे

 🔹 वैभव ठाकरे

 🔹 ओम वाघ

 🔹 सागर बावस्कर

 🔹 अमित बकतेरिया

 🔹 विश्वजीत महल्ले


सहा जखमींना ओझोन हॉस्पिटल तर उर्वरित जखमींना जी एम सी रुग्णालय, के. एस. पाटील व रावणकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील तीन युवकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आमदार सावरकर यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेटी देऊन जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली.


आमदार रणधीर सावरकर म्हणाले 


 "अकोल्यातील ही सर्वात मोठी कावड यात्रा असून दुर्दैवाने ही दुर्घटना घडली. जखमी शिवभक्तांचा संपूर्ण उपचार मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असून पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनीही जखमींच्या उपचारासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे."



या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, जखमींवर योग्य ते उपचार सुरू आहेत.

टिप्पण्या