- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-kawad-palkhi-festival- : वरुणराजा बरसला श्रीराजराजेश्वराला जलाभिषेक करायला; अकोल्यात कावड पालखी उत्सव उत्साहात साजरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
(सर्व छायाचित्र: नीरज भांगे)
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शेवटचा श्रावण सोमवार निमित्त आज पहाटेपासूनच पुरातन श्री राज राजेश्वर महादेवाच्या मंदिरात श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी मुसळधार पावसातही भाविकांनी गर्दी केली आहे. शेवटच्या श्रावण सोमवारी श्री राज राजेश्वर नगरीत जवळपास 81 वर्षापासून कावड पालखी उत्सवाची परंपरा सुरू आहे. वाघोली ( गांधी ग्राम) येथून पूर्णा नदीचे पवित्र जल आणून राजेश्वराला अभिषेक करण्याची अशी ही परंपरा आहे. काल रात्रीच कवाडधारी गांधीग्राम कडे रवाना झाले होते. आज पहाटे पासून सर्व कवाड पालखी शहराकडे मंदिराच्या दिशेने निघाल्या आहेत.BAnews24 आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्व पालख्यांचे वरुण राजाने वर्षावृष्टी करुन स्वागत केले आणि राजेश्वराला जलाभिषेक केला.
यावर्षीच्या पारंपारिक कावड व पालखी उत्सवात लहान मोठ्या सर्व धरून 150 च्या जवळपास पालख्या व 60 च्या जवळपास कावडचा सहभाग असल्याचे दिसत आहे. भारतीय अलंकार न्यूज 24
श्रावण मास सुरु झाल्याने शंकराचे भक्त साेमवारी व्रत कैवल्य करुन महादेवाची भक्तीभावाने पूजा अर्चा करीत असतात. त्यामुळे शिवालयात भक्त दर्शनासाठी येतात. भारतीय अलंकार न्यूज 24 आज शेवटचा श्रावण सोमवारी अकोल्यात साजरा होणारा पालखी कावड उत्सवामुळे गर्दीत आणखी भर पडली आहे. आराध्य दैवत राजेश्वराच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी दूरवरून भाविक अकोल्यात पोहचले.
राजेश्वर महादेवाच्या मंदिरासह शहरातील श्री खोलेश्र्वर, श्रीमाणकेश्वर, श्रीजागेश्र्वर, श्री विश्व मानव मंदिर, श्री बारा ज्योतिर्लिंग मंदिर, श्री हरीहर मंदिर आदी मंदीरात भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली.
अकोलाचे ग्रामदेवत श्री राजेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज शेवटचा श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी श्री राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिवपिंडीवर फुलांची सुंदर आणि आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. भाविकांनी बेलपत्र, धोत्राचे फळ फुल वाहून जलाभिषेक तर कुणी दुग्धाभिषेक केला.
महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या. मंदीरात यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर प्रशासनाने भक्तांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी चोख व्यवस्था केली होती. राज राजेश्वर मंदिराचा परिसर यावेळी भक्तांनी फुलून गेला होता.
राजेश्वर पालखीच्या दर्शनासाठी गर्दी
पहिली मानाची श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी राजेश्वर मंदिरात दुपारी दीड दोन वाजताच्या सुमारास पोहचली. पालखीने राजेश्वराला एक प्रदक्षिणा घालून मंदिर परीसरात सुमारास विसावली. दरम्यान कावडधारीनी पहिला जलाभिषेक केला. भारतीय अलंकार न्यूज पालखीचे ध्वजधारी आणि त्यानंतर भव्य त्रिशूळधारी यांनी राजराजेश्वराला प्रदक्षिणा घातली. याच वेळी कावड पालखी उत्सवाचे उगमस्थान असलेल्या जागृतेश्वर महादेव मंदिरातही शिवभक्त मंडळातील कार्यकर्त्यांनी जलाभिषेक केला.
मानाच्या श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखी पाठोपाठ दुसरी मानाची पालखी श्री ओंकारेश्वर आणि तिसरी मानाची पालखी श्री माणकेश्वर मंडळाने प्रदक्षिणा पुर्ण केल्या. यावेळी मंदिर परीसरात अलोट गर्दी झाली होती. हर हर महादेवचा गजर सोबत गुलाब पाकळ्या आणि गुलाल उधळून भाविकांनी पालख्यांचे स्वागत केले.
यावर्षी यात्रेमध्ये दोन महिला शिवभक्त कावड मंडळ सहभागी झाले होते. उमरीवासी, हरीहर पेठ, बाभलेश्वर मंडळाच्या पालख्यानी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक बाल कावड धारी यात्रेत विविध वेशभूषा करुन सहभागी झाले होते.
रविवारी रात्री डाबकी रोडवासी कावड मंडळाचा ट्रॅक्टर उलटून अपघात घडला. यात 20 कावडधारी जखमी झाले. ही घटना वगळता सेवा, सुरक्षा व व्यवस्था सर्व सुरळीत पार पडली.
पोलिसांची करडी नजर
पोलीस दलातर्फे अकोला शहर कावड पालखी पारंपारीक मार्गावर चोख बदोबस्त तैनात केला आहे. राजराजेश्वर मंदीर परीसर ते गांधीग्राम पर्यत पोलीस मनुष्यबळ व वाहने तैनात आहेत. मिरवणुक मार्गावरील सर्व आवश्यक त्या ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमन याकरीता वाहतुक पोलीस अंमलदार यांची नेमणुक केली आहे. तसेच सर्व महत्वाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, बॅरीगेटस, टॉवर लावले असुन घातपात विरोधी पथका तर्फे तपासणी करण्यात येत आहे. सर्व यंत्रणा द्वारा प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी ⬇️ क्लिक करा
कशी झाली कावड पालखी उत्सवाची सुरुवात...जाणून घ्या इतिहास
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा