- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. प्रफुल सुरवाडे
ठळक मुद्दे
जिल्हा व सत्र न्यायालय अकोला क्र.१ चा निर्णय
२५ हजारांच्या जातमुचलक्यावर मंजुरी
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत दाखल पॉक्सो प्रकरणातील आरोपी रितेश वानखेडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १, अकोला यांनी मंजूर केला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला.
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५१(१), ३५१(२) तसेच पॉक्सो कायदा कलम ११, १२ अंतर्गत आरोपी रितेश वानखेडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठविले होते.
आरोपीच्या वतीने अधिवक्ता प्रफुल सुरवाडे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयीन सुनावणीत अधिवक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ यांनी आज २९ ऑगस्ट रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
अधिवक्ता प्रफुल सुरवाडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे न्यायालयाने जामीन मंजूर करत २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्याची अट घातली आणि जामीन अर्ज मंजूर केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा