- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-bribe-trap-mnc-akola-: अकोला महानगरपालिकेतील प्रभारी लिपीकास ₹300 लाच स्वीकारताना रंगेहात अटक; ACB ची कारवाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या पथकाने आज (दि. २९ ऑगस्ट) महानगरपालिकेतील प्रभारी लिपीकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
आरोपीचे नाव चंद्रकांत माणिकराव अवधनकर (वय ४४ वर्ष) असून तो महानगरपालिका, अकोला येथे चेकर (तपासनिस) तसेच अतिरिक्त कार्यभार प्रभारी लिपीक, जन्ममृत्यू विभाग म्हणून कार्यरत होता.
तक्रारदाराने आपल्या तिन्ही मुलांच्या जन्म प्रमाणपत्रांवरील नावे व पत्ता दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याबाबत आरोपी अवधनकर याने काम करून देण्यासाठी रु. ३००/- लाच रकमेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब थेट अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली.
दि. २८ ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता आरोपीने पंचासमक्ष पुन्हा मागणी केली. त्यानंतर आज दि. २९ ऑगस्ट रोजी रचलेल्या सापळा कारवाईत आरोपी अवधनकर यांनी तक्रारदाराकडून रु. ३००/- लाच स्वीकारली. आरोपीस पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले असून पुढील गुन्हा नोंदणीसाठी त्याला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, अन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र तसेच सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकुमार बहाकर, उपअधीक्षक (लाप्रवि. अकोला) यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा अधिकारी प्रविण वेरूळकर, पोलीस निरीक्षक तसेच पथकातील अतुल इंगोले, दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदिप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार व चालक नफिस यांनी ही यशस्वी कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांनी आवाहन केले आहे की, “शासकीय कामाकरिता कोणीही लाच मागितल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.”
लाच
ACB Action
Akola
Akola crime
Akola news
Anti Corruption
BribeTrap
Corruption Free India
mahanagarpalika
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा