- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
6-foot-python-ridhora-busstand : रिधोरा बसस्थानक परिसरात 6 फुटी अजगराने उडवली खळबळ; MH 30 सर्पमित्र टीमने केले रेस्क्यू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रिधोरा गावातील बस स्थानक परिसरात शनिवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.25 वाजता 6-7 फूट लांबीचा अजगर (Indian Rock Python) आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, वेळीच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षितपणे पकडले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले.
रिधोरा बस स्थानक परिसरात गावातील नागरिकांना हा भलामोठा अजगर दिसला. या घटनेमुळे तिथे उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ ही माहिती अकोला जिल्हा सर्पमित्र टीमला (MH30) देण्यात आली.
माहिती मिळताच सर्पमित्र सूरज इंगळे, सूरज धायडे, आणि अभय निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने व पूर्ण काळजी घेऊन या अजगराला पकडले.
या अजगराला पकडल्यानंतर त्याला सुरक्षितपणे वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. वन विभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली.
अकोला जिल्हा
रिधोरा बस स्थानक
वन विभाग
Indian rock python
MH 30 group
Ridhora bus stand
Snake lovers
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा