sambhaji-bhide-guruji-at-akola: आजच्या काळातही ‘जयचंद’ पासून सावध राहण्याची गरज- संभाजी भिडे गुरुजी यांचे वक्तव्य



ठळक मुद्दे


संभाजी भिडे गुरुजी यांची अकोल्याला धावती भेट


आमदार सावरकर यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा



भारतीय अलंकार न्यूज 24

BAnews24 

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : प्रत्येक नागरिक हिंदुत्वाबद्दल जागृत होत आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु जयचंद यांच्यामुळे प्राचीन काळापासून त्रास होत आहे. आजच्या काळातही अश्या जयचंद पासून सावध राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. भिडे गुरुजी आज अकोल्यात आले असता त्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्याशी विविध सामाजिक आणि हिंदुत्व विषयी चर्चा केली. तसेच संभाजी भिडे गुरुजी यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. 



मलकापूर येथे कार्यक्रमाला जात असताना डाबकी रोड येथील आदित्य केंदाळे यांच्या निवासस्थानी भिडे गुरुजी यांनी भेट दिली. यावेळी अकोला भाजप तर्फे अकोला पूर्व तर्फे आमदार सावरकर यांनी त्यांचे स्वागत केलं. यावेळी करण शाहू, विठ्ठल देशमुख, निलेश निनोरे, तुषार भिरड, माधुरी क्षीरसागर, पद्माकर मोरे, हरिदास ठाकरे, आशिष पुरी, विलास शेळके उपस्थित होते. 




केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने गड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून आणि मराठा शौर्य प्रतीक म्हणून मान्यता मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गजेंद्रसिंग शेखावत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री एडवोकेट आशिष शेलार यांचे संभाजी भिडे गुरुजी यांनी अभिनंदन केले. 



भिडे गुरुजी यांनी विविध विषयावर आमदार सावरकर यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी सामाजिक दायित्व म्हणून गोरक्षण करण्याची गरज असल्याचे भिडे गुरुजींनी सांगितले.


या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ⬇️

संभाजी भिडे गुरुजी अकोल्यात

टिप्पण्या