political-news-akola-congress: जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात अकोला महानगर काँग्रेसचा एल्गार!



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी स्वराज्य भवनासमोर लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. या कायद्याच्या माध्यमातून सरकार जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणत असून, सरकार विरोधाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.


या निदर्शनात "जनसुरक्षा नव्हे, ही जनदडपशाही आहे" असा नारा देत या कायद्याची तुलना ब्रिटिश राजवटीतील रॉलेट कायद्याशी तुलना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार हिरावणारा हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमचा रोजगार द्यावा, या मागणीसह महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावे, असा इशाराही काँग्रेसने दिला.


या आंदोलनाचे नेतृत्व आमदार साजिद खान पठाण व महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. 



या वेळी प्रदेश सचिव प्रकाश तायडे, माजी आमदार बबन चौधरी, अब्दुल जब्बार, महेंद्र गवई, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश कवडे, महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष मो. इरफान, कपिल रावदेव, कपिल ढोके, पराग कांबळे, जमीर बर्तनवाले, मो. नौशाद, फजलू पहेलवान, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश तायडे, एनसीयूआय अध्यक्ष अभिजीत तंवर, दत्ता देशमुख, गणेश कळसकर, रब्बानी शाह, फिरोज गवळी, अब्दुल्ला भाई, सज्जुभाई, सखावत शाह, सुनील वानखडे, संदेश वानखडे, पंकज वाडवे, सचिन तिडके, तपस्सु मानकीकर, सचिन शेजव, तशवर पटेल, मनीष हिवराळे, रमेश समुद्रे, राहुल सारवान, महेंद्र सत्याल, सोहेल खान, निलकंठ पाचकोहे, रविंद्र तायडे, भगवान गोवित, शेख अर्शद, मंजूरभाई, समीर खान यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या आंदोलनामुळे शहरात चांगलाच राजकीय ऊहापोह निर्माण झाला असून सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

टिप्पण्या