भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोल्याच्या वतीने आयोजित प्रवचन मालिकेमध्ये बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष विजय जाधव यांनी चौथे पुष्प गुंफले.
अशोक वाटिका या ठिकाणी संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. जे. वानखडे तसेच मंचावर जिल्ह्याचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे व महिला अध्यक्षा इंदुताई मेश्राम उपस्थित होत्या.
देशातील बौद्धांचे महाबोधी महाविहार हे बौद्धांचे अतिशय महत्त्वाचे स्थळ असून हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे असे विजय जाधव यांनी मत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की लुंबिनी, सारणाथ, कुशीनगर, वैशाली, श्रावस्ती, नालंदा, राजगिरी, सांची, चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही सर्व स्थळे बौद्धांची पवित्र स्थळे असून हे संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब आहे, असे विजय जाधव पुढे म्हणाले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण पी.जे.वानखडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्ह्याचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्ह्याचे संघटक विलास बावस्कर यांनी व आभार प्रदर्शन जिल्ह्याचे संघटक पी. जे. शेगावकर यांनी केले.
यावेळी जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे सचिव पंचशील गजघाटे, प्रचार प्रसार सचिव राहुल गोटे महानगर अध्यक्ष गोरखनाथ वानखडे, लक्ष्मणराव नंदागवळी, संतोष रायबोले, वैशाली गोटे, सिंधु शेगोकार, करूणा साखरकर, भाऊसाहेब थोरात, कांता थोरात, सुरेश मोरे जिल्ह्याचे, महानगराचे, महिला विभागाचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे जिल्ह्याचे प्रचार, प्रसार सचिव संजय गवई यांनी कळवले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा