festivals-first-shravan-monday: प्राचीन श्रीराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा; भाविकांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त, जुने शहरात 'हर हर महादेव' चा जयघोष

  फोटो: दीपक शर्मा, अकोला



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला शहरातील  प्राचीन श्रीराजेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यासाठी चढा ओढ लागली आहे. पहाटे पाच वाजल्या पासूनच शिवभक्त मंदिरात येत आहेत. दर्शनासाठी विशेषता महीला भाविकांची गर्दी जास्त दिसत आहे. 




रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणतही भाविकांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही.  




संपूर्ण जुने शहरात हर हर महादेव जयघोष गर्जत आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले आहे.




सोमवारी पहाटे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.  मंदिरात भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीने चोख व्यवस्था केली आहे.  महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली आहे. जेणेकरून कोणत्याही भाविकांना कोणतीही अडचण येवू नये.




रविवारी सायंकाळी मंदिर परिसरात हार फुले बेलपत्र विक्रेते दुकाने थाटून बसली आहेत. मंदिर परिसरात गृहपयोगी वस्तू आणि पूजेचे साहित्य विक्रीचे दुकाने असल्याने परिसराला जत्रेचे स्वरुप आले  आहे.




श्री राजेश्वर शिव मंदिराचा दरबार पहिला श्रावण सोमवार निम्मित रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला.    




भाविकांची मंदिरात गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





पहिल्या सोमवारीच कावड 



अकोल्यात शेवटच्या श्रावण सोमवारी पालखी कावड यात्रा काढण्याची प्रथा आहे. मात्र, अलीकडे कावडधारी शिवभक्त पहिल्या श्रावण सोमवारीच कावड आणून महादेवाला जल अभिषेक करतात. यावर्षी रविवारीच रात्री अनेक कावडधारींनी वाघोलीला जावून पुर्णा नदीचे जल आणून आज श्री राजेश्वराला अभिषेक केला. तर अनेक बाल शिवभक्तांनी छोट्या छोट्या पालखी कावड आणून राजेश्वराला जलाभिषेक केला.

Video ⬇️

पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी

फोटो सौजन्य: दीपक शर्मा, अकोला

टिप्पण्या