devendra-fadnavis-weakest-hm: देवेंद्र फडणवीस आतापर्यंतचे सर्वात कमकुवत गृहमंत्री- हर्षवर्धन सपकाळ यांची टीका




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: खामगाव येथील रोहण पैठणकर यांच्यावर त्यांच्या जाती-धर्माची चौकशी करून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा चेहरामोहरा उघड केला आहे. या गंभीर घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, तसेच आजवरच्या सर्व गृहमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार आणि कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मंगळवारी सकाळी त्यांनी अकोला येथे उपचार घेत असलेल्या रोहन पैठणकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


मागील आठवड्यात खामगावमध्ये रोहन पैठणकर या युवकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून, त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे, याचे प्रत्यंतर येते. हल्लेखोरांनी पीडिताची जात आणि धर्म विचारून त्याला "गाय चोर" म्हणत अमानुषपणे मारहाण केली आणि त्याला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविण्यात आला असून, त्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.


यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात आता कायदा-सुव्यवस्थेचे काहीच उरलेले नाही. मॉब लिंचिंगच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. रोहन पैठणकर यांच्यावर झालेला हल्ला देखील मॉब लिंचिंगचाच एक प्रकार असून, समाजात जातीय तणाव पसरवणारी ही अतिशय धोकादायक घटना आहे. मागील काही काळात महायुती सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असून, गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला.


सपकाळ यांनी सांगितले की, रोहण पैठणकर यांच्यावर अकोला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अद्याप बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून कोणताही अधिकारी न भेटीस आला, ना त्यांनी निवेदन घेतले, ना कुटुंबियांची संवेदना जाणून घेतली. ही गोष्ट सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, बबनराव चौधरी, महेंद्र गवई, धनंजय देशमुख, रामविजय पुरुंगळे, तेजेंद्र चौहान, डॉ. जिशान हुसैन, कपिल रावदेव, कपिल ढोके, प्रमोद अवसरमोल, मोहम्मद इरफान, मोइन खान, मेहबूब खान, अफरोज लोधी, पराग कांबळे, मनीष हिवराळे, राजेश मटे, आलमगीर खान, सय्यद जहागिरदार, एजाज खान, जमीर बर्तनवाले, मोहम्मद नौशाद, हेमंत देशमुख, महेश गणगणे, अभिलाष तायडे, अज़हर इकबाल, फिरोज गवळी, सुनील वानखेडे, गणेश कळसकर, विनोद मराठे, गौतम गवई, संदेश वानखेडे, प्रमोद गवई, प्रशांत प्रधान, आशिष सोनोने यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⬇️

video: Rohan paithankar पर हमले के जिम्मेदार देवेंद्र फडणवीस - हर्षवर्धन सपकाळ

टिप्पण्या