- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ashadhi-ekadashi-2025-akola: आषाढी एकादशीला अकोल्यात फुलला भक्तांचा मळा; पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जुने शहर स्थित 321 वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे गत 92 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आज आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी षोडशोपचारे अभिषेक व महापूजा मंडळाचे सर्व सेवा अधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा व अर्चना शर्मा यांचे हस्ते संपन्न झाली.
याप्रसंगी मंदिर विश्वस्त समितीचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, यशोधन गोडबोले, आनंद उगले, नितीन खोत, संजय ठाकूर, महेश कडूसकर, राजेश खोत, बबलू ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
पहाटे पासून मंदिरामध्ये विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. परिसरामध्ये यात्रेचे स्वरूप आले आहे. मंदिर व्यवस्थापन व मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
अकोला शहर
जुने शहर
पुरातन मंदिर
विठ्ठल मंदिर
Akola
ancient temple
Ashadhi Ekadashi 2025
devotees bloom
Shri Vitthal Rukmini
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा