- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-krishi-nagar-riot-case-: कृषी नगर दंगल प्रकरण: नागझरी येथून सहा आरोपींना अटक; अग्नीशस्त्र जप्त, एलसीबीची कारवाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कृषी नगर भागात उफाळलेल्या दंगल प्रकरणी शेगाव नागझरी येथून फरार सहा आरोपींना आज शनिवारी 19 जुलै रोजी अटक करण्यात आली असून, एका आरोपीकडुन अग्नीशस्त्र जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई एलसीबीने केली आहे.
यबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १०/०७/२०२५ रोजी मध्यरात्री पो.स्टे. सिव्हील लाईन हददीत कृर्षी नगर येथे फिर्यादी सतिश रघूनाथ वानखडे वय ३४ वर्ष रा. पंचशिल नगर कृषी नगर अकोला यांनी तक्रार दिली. तसेच दुसऱ्या गटाचे आकाश सूनिल गवई वय २७ वर्ष रा. पंचशिल नगर कृर्षी नगर अकोला यांनी देखील तक्रार दिली कि, दोन्ही पार्टीचे लोकांमध्ये आपसात वाद असून राग मनात धरून गैर कायदयाची मंडळी जमवुन प्राणघातक हत्यारांचा वापर करून जख्मी यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचेवर हमला केला. तसेच फिर्यादी सतिश रघूनाथ वानखडे वय ३४ वर्ष रा. पंचशिल नगर कृषी नगर अकोला यांनी तक्रार दिली कि आरोपीतानी हातात लाठी काठया. लोखंडी पाईप, रापटर, लोखंडी तलवार व गावठी कटयाने तसेच लाथाबूक्यानी त्यांना चापट मारून जिवे मारण्याची धमकी दिली अश्या फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. २४९/२०२५ कलम १८९, (२) १९०, १९१(२), १९१(३), २९६, ११५ (२),११८(१), ११८(२), १०९, १२५ भा.न्या.सं. चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गंभीर घटना घडल्यानंतर यातील मुख्य व महत्वाचे आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्था.गु.शा. अकोलाचे शाखाधिकारी शंकर शेळके यांना सदर गुन्हयातील फरार आरोपी यांचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अकोला यांचे आदेशाप्रमाणे पो. नि. शंकर शेळके स्था. गु.शा. अकोला यांनी घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी करून गुन्हयाची माहिती अवगत करून घेतली. तसेच सदर गुन्हयामध्ये आरोपी स्वप्नील प्रविण बागळे वय २५ वर्ष, शुभम विजय हिवाळे वय २४ वर्ष रा. कृर्षी नगर अकोला हे यापुर्वीच अटक असुन गुन्हयातील फरार आरोपी शोध कामी स्थागुशा येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथक निर्माण करून त्यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या. दिलेल्या सुचनेप्रमाणे स्था.गु.शा. अकोलाचे अधिकारी व पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीवरून व तांत्रीक विश्लेषणावरून गुन्हयातील फरार आरोपी हे दि. १९/०७/२५ रोजी ग्राम नागझरी ता. शेंगाव जि. बुलडाणा येथे लपुन असल्याची माहीती मिळाल्याने स्थागुशा येथील पोउपनि विष्णु बोडखे व त्यांचे पथकातील अंमलदार हे तात्काळ ग्राम नागझरी येथे पोहचुन मिळालेल्या गुप्त माहीतीप्रमाणे फरार आरोपी निखील उर्फ बंटी च-हाटे वय २४ वर्षे, अनिकेत विनोद गवई वय २३ वर्षे, अनिकेत दिपक सावळे वय २२ वर्षे, धम्मपाल शामराव तायडे वय २४ वर्षे, शंतनु गोपाल तायडे वय २२ वर्षे सर्व रा.कृषी नगर अकोला, आकाश उर्फ दादु उत्तम खडसे वय २६ वर्षे रा. पांगरी नवघरे ता मालेगाव जि. वाशीम ह.मु. कृषी नगर, अकोला यांचा शोध घेवुन त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले त्यास गुन्हयादरम्यान सिसिटीव्ही मधे देशी कटटा हातात असल्याची फुटेजमधे दिसुन आल्याने नमुद आरोपी याने गुन्हयात वापरलेले गावठी पिस्तुल त्याचे राहते घरी पांगरी नवघरे ता. मालेगांव जि. वाशिम येथे ठेवली असल्याची कबुली दिली. त्यावरून लगेच त्याचे राहते घरी जावुन कायदेशिररित्या जिवंत १ काडतुस व देशी कटटा किंमत अंदाजे ३५,५००/- रू. चा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून तात्काळ तपास अधिकारी पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला यांचेकडे एकुण ०६ आरोपी व जप्त मुददेमाल तात्काळ ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बि. चंद्रकांत रेडडी यांचे मार्गदर्शनात पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. विष्णु बोडखे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस अंमलदार रवि खंडारे, अब्दुल माजीद, शेख वसिम, किशोर सोनोने, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, अशोक सोनवणे, अमोल दिपके, चालक देवानंद खरात यांनी केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा