akola-crime-insurance-agent: इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरवर होती एजेंटची नजर; संधी मिळताच भररस्त्यात त्याने केला कहर…

                  संग्रहित प्रतिकात्मक चित्र



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सदैव गजबजलेल्या जठारपेठ चौकात भररस्त्यावर एका तरुणीवर रोजच्या ओळखीतल्या व्यक्तीकडून जबरदस्ती संबंध करण्याचा प्रयत्न झाला. अश्या कठीण प्रसंगातून स्वसंरक्षणार्थ या तरुणीने त्या व्यक्तीच्या गुप्त अंगावर वार करीत सुटका करून घेतली. ही घटना उघडकीस येताच अकोला शहरात खळबळ उडाली.


एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीतील 22 वर्षीय 'युनिट मॅनेजर तरुणी सोबत कंपनी मधीलच एजंटने हा  घृणास्पद प्रकार केला आहे. गणेश ठाकूर असं या एजंटचे नाव आहे. 



दरम्यान, घटनेनंतर एजंट हा मॅनेजर तरुणीला मोबाईल मेसेजद्वारे बदनामीबाबत तसेच सुसाईड करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवू लागला. मात्र आरोपीकडून त्रास वाढत गेल्याने तरुणीने आरोपी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर गणेश ठाकूर याच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 75 (2), 76, 351 (2) (3) बी.एन.एस अंतर्गत विविध कलमानुसार आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.



पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, अकोला शहरातील गौरक्षण मार्गावर आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. येथे युनिट मॅनेजर पदावर पीडित तरुणी कार्यरत आहे. तिच्याकडे कंपनीने एजेंट गणेश ठाकूर याच्याकडून विमा व्यवसाय करून घेण्यासाठी जबाबदारी दिली होती. अशातच ती 16 जूनला ऑफिसमध्ये कर्तव्यावर असताना एजंट गणेशने म्हटले की कस्टमर कॉल आहे, तिथं जावं लागणार. नंतर दोघेही तिथे जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. त्याने त्याच्या कारमध्ये येण्यासाठी तिला आग्रह धरला. कारच्या पाठीमागील सीटवर ती बसली. कस्टमरचं घर दाखवण्याच्या उद्देशाने त्याने अकोला शहरातल्या रस्त्यांवर तिला फिरवलं. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वर्दळीच्या जठारपेठ चौकातील एका दूध डेअरी समोर गाडी उभी केली. येथे तो पाठीमागील सीटवर तरुणीच्या बाजूला येऊन बसला. मॅनेजर तरुणीसोबत बोलत असतानाच त्याने अचानक तिचा हात पकडत तिच्या सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान तरुणीने आरडाओरड करायला सुरुवात करताच त्याने तिचे तोंड दाबले आणि तिला मारहाण केली. 



कार मध्ये तिच्यासोबत जबरदस्ती संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत  तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. तरूणीने सावध होत कडा प्रतिकार करीत त्याला जोरदार धक्का देत, त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. आणि बाजूला पडलेल्या चाबीने गाडी अनलॉक करीत कारमधून पळ काढला. या प्रसंगानंतर आरोपीने सातत्याने फिर्यादीला प्रत्यक्ष बोलून व मोबाईल मेसेज करून बदनामी करण्याबाबत तसेच सुसाईड करून फसविण्याबाबत धमकी देवू लागला. आरोपीच्या जाचाला कंटाळून अखेर तरुणीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. 



काल रात्री उशिरा तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपी गणेश ठाकूर याला पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील ताब्यात घेतले आहे.

टिप्पण्या