akola-city-gaigaon-foot-march: श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निम्मित अकोला गायगाव पायदळ यात्रा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे 17 किमी अंतरावर असलेल्या निमकर्दा येथील गायगावचा गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमते.
आज चतुर्थी निम्मित अकोल्यातील शेकडो भाविक पायी चालत गायगाव गणपतीच्या दर्शनाला गेले होते.
अकोल्यातील जय श्रीराम ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या वारीचे यंदाचे हे 21 वे वर्ष आहे. 3 भाविकांनी सुरू केलेल्या या पदयात्रेत आता हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी होतात.
त्याच प्रमाणे दिवसभरात अकोल्यातील अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. शेतकरी सुखावला पाहिजे आणि देशात शांतता नांदली पाहिजे या श्रद्धेने हे सर्व भाविक पायदळ वारी करतात.
जय श्रीराम ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या पायदळ वारीला यशस्वी करण्यासाठी नरेंद्र राठी, नरेंद्र तापडिया आणि पंकज पटेल यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा