akl-crime-news-atrocity-case-: ॲट्रासिटीच्या गुन्ह्यामधील ते आरोपी अद्यापही मोकाट; अवैध व्यवसाय विरुद्ध आवाज उठविणाऱ्या युवतीला न्याय मिळणार का ?




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील उच्चभ्रू वस्ती मधील एका रहिवासी इमारतीमधील सदनिकेत अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुध्द आवाज उठविणाऱ्या उच्च शिक्षित युवतीला व तिच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या प्रकरणातील आरोपींचा अटक पूर्व जामीन अपील मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने देखील 

एप्रिल 2025 रोजी फेटाळला आहे. तरीसुद्धा आरोपी पकडण्यात पोलीस  जाणूनबुजून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.


या प्रकरणाची हकीकत अशी की, जठार पेठ भागातील एका रहिवासी इमारती मध्ये आरोपी महिला आणि तिच्या विवाहित मुलीचे फ्लॅट आहेत. याठिकाणी तिचा जावई देखील नेहमी येतो. फिर्यादी व तिचे कुटुंब देखील या इमारतीत मागील पंचवीस वर्षापासून राहत आहेत. याच इमारतीत आरोपीने एका फ्लॅटवर कब्जा करून त्यात भाडे करू म्हणून मुली ठेवतात. या मुलींना भेटण्याकरता नवनवीन मुले देखील येतात. याबाबत फिर्यादीने आरोपीस विचारणा केली असता तिने भाडेकरू असल्याचे सांगितले. याबाबत फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी सन 2021 मध्ये रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली होती. यानंतर सुरळीत सुरू असताना 2024 मध्ये  फ्लॅटमध्ये संशयितरित्या मुलगा व मुलगी इमारतीमधील अन्य एका व्यक्तीस दिसली. यानंतर सर्व रहिवाशांनी मुलाला व मुलीला फ्लॅट बाहेर काढून त्या अज्ञात मुलाला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले. यानंतर आरोपीस विचारणा केली असता तिने देखील उडवा उडवीचे उत्तर दिले. मात्र त्या अज्ञात मुलीने सांगितले की, आरोपी क्रमांक तीन याने तिला आरोपी क्रमांक एकच्या फ्लॅटमध्ये ठेवले आहे. यानंतर स्थानिक रहिवाशांनी मुलाला चापटाने मारले. तसेच पोलिसांना बोलविले असता त्यांनी कोणतेही कारवाई केली नाही. पोलीस निघून गेल्यावर आरोपींनी तक्रारकरता यांना अभद्र जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून गेले. या घटनेची तक्रार देण्याकरता फिर्यादी पोलीस स्टेशनला गेली असता सुरुवातीस नोंद घेतली नाही. यानंतर सोसायटी रजिस्टर नसल्याचे कारण सांगत कारवाई करू शकत नसल्याबाबत फिर्यादीस सांगितले त्यानंतर फिर्यादीने परत पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार नोंदविली होती.



तक्रारकर्त्याने दि. 27/7/2024 मध्ये आरोपींविरुध्द बेकायदेशीररित्या घर भाड्याने देवुन तेथे गैरकायदेशीररित्या कृत्य करतात व तक्रारकर्ता यांना जातीवाचक अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याबाबत आरोपी विरुध्द तक्रार देण्यात आली होती. परंतू सदरहू प्रकरणात पोलीसांनी आरोपींविरुध्द कोणतीही दखल घेतली नाही, म्हणुन तक्रारकर्ता यांनी दिनांक 08/08/2024 रोजी रितसर लेखी तक्रार देवुन कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता विनंती केली. तरीही तक्रारकर्ता यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही, म्हणुन तक्रारकर्ता यांनी दि.12/08/2024 रोजी पोलीस अधिक्षक अकोला यांच्याकडे लेखी तक्रार देवुन दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली. मात्र पोलीसांनी दि. 05/02/2025 रोजी अट्रासिटीचा गुन्हा नोंदवुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. सदरहू गुन्हामध्ये आरोपी यांनी अटकपुर्व जामीन मिळविण्याकरीता  जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे अर्ज दाखल केला. दि.04/3/2025 रोजी न्यायालयाने आरोपीचा अटकपुर्व जामीन फेटाळला. म्हणुन दि. 22/03/2025 रोजी आरोपी यांनी उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे अटकपूर्व जामीन अपील केली. सदरहू प्रकरणात 22/04/2025 रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे सुध्दा आरोपीचा अपील फेटाळण्यात आली. तरीही अद्यापही आरोपी हे बिनधास्तपणे शहरामध्ये वावरत आहेत.  पोलीसांतर्फे आरोपीविरुध्द कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. आरोपीविरुध्द अट्रासिटी सारखा गुन्हा दाखल असून सुध्दा आरोपी बिनधास्तपणे शहरामध्ये राहुन पोलीसांच्या आश्रयामध्ये राहत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलीस विभाग आरोपींना पकडून अवैध व्यवसाय विरुद्ध आवाज उठविणाऱ्या युवतीला न्याय मिळवून देतील का, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 



दरम्यान, आज फिर्यादीने रामदास पेठ पोलीस ठाणे येथे या प्रकरणाचे तपास अधिकारी यांना याबाबत विचारले असता आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

टिप्पण्या