भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : आज 11 वे जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तेही जरा हटके पद्धतीने.
अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरण तलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात.
आजच्या या योग दिनामध्ये 8 वर्षाच्या चिमुकली ते 80 वर्षांच्या आजोबांनी या मध्ये सहभाग नोंदविला.
जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य आहेत.
आज योगदिनी जलतरणपटूनी शवासन ,पद्मासन, ताडासन,शीर्षासन सह विविध योगसन पाण्यावर तरंगत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा