school-entrance-ceremony-25: मनुताई कन्यात शाळेत विद्यार्थिनींना वृक्षांचे वितरण; ढाेलच्या गजरात शाळा प्रवेशाेत्सव



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पारंपरिक शिक्षणासाेबत  कौशल्य विकासावर आधारित विविध क्लासेसमधून विद्यार्थिनींनी स्वयंराेजगारचे धडे शिकवण्यात येणाऱ्या मनुताई कन्या शाळेत साेमवारी शाळा प्रवेशाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले. 



मनुताई कन्या शाळेत विद्यार्थिनी संगणक, विविध शिवणकामचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या आत्मनिर्भर हाेत आहेत. ५०० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, ८० पेक्षा जास्त शिलाई मशीनचे वितरणही करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांनी  स्वत:चा उद्याेग उभा करून स्वतः सह कुटुंबाला हातभार लावत तर आहेतच; शिवाय नोकरी मागणाऱ्यांपेक्षा त्या राेजगार देणाऱ्या उद्याेजिका म्हणून नावारुपास येत आहेत.    



मनुताई बापट यांनी १९११मध्ये लेडिज हाेमक्लास या संस्थेची स्थापना केली हाेती. त्यानंतर सुरु झालेल्या विदर्भातील पहिल्या मनुताई कन्या शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येतात. 



दरम्यान साेमवारी शाळा प्रवेशाेत्सव पार पडला.  शाळेच्या मुख्यद्वारवर रांगाेळी काढण्यात आली. ढाेल वाजवत विद्यार्थिनी, पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींना वृक्ष व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मिष्ठान्न देऊन आनंदाेउत्सव साजरा करण्यात आला. 



यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते प्रमुख गिरीश जाेशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.    यावेळी मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर, शिक्षिका राेहिणी बाेंबटकर, संज्याेत मांगे, वैशाली राठाेड, कर्मचारी शैलेष भराटे आदी हाेते. जाेशी यांचे शाळेला विविध कार्यात सहकार्य लाभते, असे शिक्षिका म्हणाल्या. 




गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक - जाेशी


परम संगणकाचे जनक विजय भटकर हे सरकारी शाळांमध्ये शिकले. त्यांनी संगणक क्षेत्रात प्रचंड कार्य करीत समाजाला वेगळी दिशा दिली.     शिक्षिकांनी तळागाळातील गरजू, गरीब मुलींंना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहन गिरीश जाेशी यांनी केले. महिला शिक्षणांसह सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. मात्र सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून, आता अनेक शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे आगामी शिक्षकांना दर्जेदार शिक्षणासाठी  परिश्रम घ्यावे लागणार आहे, असेही जाेशी म्हणाले.

टिप्पण्या