भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जुने शहरतील हरिहर पेठ भागात आज एका बोगस डॉक्टरवर अकोला महानगर पालिका व अन्न औषध विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. तथाकथित हे डॉक्टर महाशय आपल्या रुग्णालयात विना वैद्यकीय शिक्षण पदवी वा परवाना शिवाय रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले. या डॉक्टर विरोधात आता अधिकाऱ्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आयुक्त महानगरपालिका अकोला यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे हरीहर पेठ, जूने शहर येथे विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या कथित डॉक्टर विरुद्ध कार्यवाही करण्यात आली.
डॉ. आशिष गिहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा, अकोला, डॉ. अनुप चौधरी वैद्यकीय अधिकारी, डॉ. विजय चव्हाण वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रभाकर मुदगल वैद्यकीय अधिकारी मनपा, अकोला व जुने शहर पोलिस स्टेशन येथील कर्मचारी अनिल कोरडे यांच्या पथकाद्वारे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान हरीहर पेठ जूने शहर येथे कथित हॉस्पिटलवर धाड टाकण्यात आली.
कार्यवाही दरम्यान कथित डॉक्टर कोणतीही वैद्यकीय व्यवसायाची डिग्री व रुग्णालय नोंदणी नसताना रुग्ण तपासणी व रुग्ण भरती करताना आढळून आले, त्यांना या बाबत विचारणा केली असता त्यांच्या कडे कुठलीही डिग्री ते दाखवू शकले नाहीत. तसेच सदर हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग होम अक्ट 1949 अंतर्गत मान्यता बाबत विचारणा केली असता अशी कोणतेही नोंदणी त्यांनी केली नसल्याचे सांगितले.
हॉस्पिटलची तपासणी करते वेळी तेथे 8 बेडस टाकलेले होते. त्यापैकी काही बेडवर रुग्णांना IV Saline लावलेले होते. तेथे बऱ्याच प्रमाणात औषधी साठा आणि वैद्यकीय व्यवसायात उपयोगी मशिन व उपकरणे दिसून आले. सदर सीलबंद औषधीसाठा ए.सी. माणिकराव व श्री गोतमारे औषधी निरीक्षक, औषधी विभाग अकोला यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आला.
कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक अहर्ता (Degree) नसतांना अवैध रित्या कायद्या अंतर्गत नोंदणी नसलेल्या ठिकाणी रुग्ण भरती करून कथित डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले.
कार्यवाही दरम्यान अंकुश धुड, पंकज गायकवाड, कुलदीप बारबदे, किरण शिरसाठ हे सहभागी होते. तसेच सदर प्रकरणी शुभांगी ठाकरे (विधी समुपदेशक ) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पीसीपीएनडीटी विभाग अकोला यांनी विधी विषयक मार्गदर्शन केले. याबाबत फिर्याद डॉ. आशिष गि-हे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला यांचे मार्फत जुने शहर पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा