narayan-maharaj-tarale-vyala: ह.भ.प. नारायण महाराज तराळे यांचे वैकुंठगमन; व्याळा गावी वारकऱ्यांची गर्दी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भ वारकरी महर्षी गुरू ह.भ.प. नारायण महाराज तराळे यांचे वैकुंठगमन आज शनिवार 28 जून 2025 रोजी झाले. वयाच्या 98 वर्षी त्यांनी मुळगाव व्याळा येथे अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 



वारकरी संप्रदाया मधील जेष्ठ व्यक्तिमत्व गुरू ह.भ.प.नारायण महाराज तराळे (राहणार व्याळा, तालुका बाळापुर, जिल्हा अकोला) यांचा जन्म शेतकरी वारकरी कुटुंबात 1928 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण 7 वी पर्यंत झाले होते. वयाच्या 13 व्या वर्षापासून महाराज यांनी वारकरी संप्रदायच्या सेवेशी एकनिष्ठपणे शेवटपर्यंत अविरत सेवा केली. त्यांना वारकरी परंपरेतील  गुरू दादा महाराज ,गुरू सखाराम महाराज ,गुरू पाटकर महाराज गुरू भोजने महाराज या थोर संतांचा सहवास लाभला होता.



नारायण महाराज यांनी वै. पांडूरंग महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुर  आणि श्री क्षेत्र मुक्ताई नगर 60 वर्ष समर्थपणे  सांभाळला होता.



आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी  निस्वार्थपणे सम्पर्पीत केले होते.



महाराज यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली. महाराजांना त्यांच्या अफाट कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी विरह अभंग मालिका निर्माण केली.



नारायण महाराज यांच्या पश्चात दोन मुले, मुली, जावई, स्नुषा, नातू आणि पणतू आहेत. 


महाराज यांची परंपरा त्यांचे मोठे चिरंजीव ह.भ.प. निवृत्ती महाराज तराळे हे त्याच नियमाने संभाळत आहेत. निवृत्ती महाराज हे पायी दिंडीत चालत आहेत.



नारायण महाराज यांची निधनाची बातमी कळताच त्यांच्यावर प्रेम करणारे  शेतकरी, वारकरी त्यांच्या व्याळा गावी जात आहेत.




महाराज त्यांच्या किर्तनामधुन 

पुढील अभंग उदाहरण देत असत.


तुका म्हने मज घडो  त्यांची सेवा|


तरी माझ्या दैवा पार नाही||


तुझे देने तुझे समरपुंनी|


झालो उतरायी  पांडूरंगा||



वै. गुरू ह.भ.प. नारायण महाराज यांच्या व्यापक कार्याला शतकोटी राम कृष्ण हरी.


भावपुर्ण श्रद्धांजली



शोकाकुल,


प्रदीप बाबाराव म्हैसने

नांदखेड 

ह.मु. मुंबई 

तथा

समस्त वारकरी बांधव 

विदर्भ.






टिप्पण्या