भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: खदान पोलीस स्टेशन हद्दीत एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींचा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. घटने पासून आरोपी कारागृहात होते.
या प्रकरणातील फिर्यादी हे 1 एप्रिल रोजी खडकीकडे असताना आरोपी सूरज आणि चेतन डोंगरे यांनी फिर्यादीचा पाठलाग करून त्याच्यावर तलवार आणि लोखंडी पाईपने हल्ला केला होता. यानंतर फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती.
आरोपी चेतन दिलीप डोंगरे आणि सूरज दिलीप डोंगरे यांचे विरोधात 2 एप्रिल 2025 रोजी पोलीस स्टेशन खदान येथे B N S चे कलम 118, 109, 3 (5) तसेच Arms ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तद्नंतर पोलीस स्टेशन खदान यांनी आरोपींना अटक करून न्यायालयाचे आदेशाने आरोपीची कारागृहात रवानगी केली होती.
दरम्यान, आरोपी क्रमांक 1 तर्फे ॲड. निखिल वाघमारे व आरोपी क्रमांक 2 तर्फे ॲड. प्रफुल्ल सुरवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात 17 जून रोजी उच्च न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य ठरवून जस्टिस उर्मिला फाळके जोशी यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज अटी व शर्तीवर मंजूर केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा