animal-husbandry-dairying-ak: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून जन्मली जातिवंत साहिवाल कालवड; पिडीकेव्ही पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचा उपक्रम!



ठळक मुद्दा 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून जातिवंत गोवंशाचे संवर्धन व वृद्धीकरण!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जागतिक हवामान बदलाच्या या कालखंडात शेती व्यवसायाला सक्षम पूरक व्यवसायाची गरज अधोरेखित झाले असून पर्यायाने पशुपालन तथा दुग्ध व्यवसायांचे महत्त्वाचे एक प्रकारे वाढले असल्याचे चित्र आहे. पारंपारिक दुग्ध व्यवसायामध्ये अल्प व अत्यल्प दुग्धोत्पादन करणाऱ्या तथा वंश हरविलेल्या गावरान गोवंशाचा अधिक भरणा असल्यामुळे पशुपालनाला आर्थिक उत्पादनाचा मुख्य स्त्रोत म्हणून वऱ्हाडात अद्यापही अपेक्षित स्थान मिळत नाही. त्यातल्या त्यात बैलांचे माध्यमातून करावयाची शेतीची कामे आता यंत्र अवजारे करीत असून परिणामी बैलांची सुद्धा उपयोगिता दिवसे गणित कमी होत आहे. 


दुधाळ जनावरांचे बाबतीत प्रत्येकाला स्त्री वंश म्हणजेच कालवड जन्माला येणे अपेक्षित आहे, नेमकी हीच बाब हेरत पशु वैज्ञानिकांचे अथक परिश्रमातून शक्यतो कालवडीत जन्माला येतील अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून "फीमेल सेक्स सॉर्टेड सिमेन" म्हणजेच कृत्रिम रेतनाचे माध्यमातून शक्यतो कालवडी जन्माला घालण्याचे रेत पशुवैद्यकांकडे उपलब्ध होत आहेत. 



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात तथा विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांचे नेतृत्वात  " देशी गोवंश संवर्धन व वृद्धीकरण" उपक्रमा अंतर्गत देशातील सर्वाधिक दुग्धोत्पादन करणाऱ्या साहिवाल जातीच्या गाई त्यांच्या मूळ स्थानातून आणत त्यांना फिमेल सेक्स सॉर्टेड सिमेन वापरत त्यांचे पासून शुद्ध जातिवंत साहीवाल कालवडी निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. 



सदर साहिवाल गाई पासून निर्माण होणाऱ्या शुद्ध जातीवंत साहिवाल कालवडी अधिक उत्पादनक्षम राहणार असून याद्वारे गोपालकांना फायदेशीर दुग्ध व्यवसायाचे तंत्रज्ञानाचे माध्यमातून अधिक अर्थार्जना साठीची शाश्वतता प्रदान होईल असा विश्वास आहे. 




या उपक्रमासाठी पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजेश्वर शेळके, प्रा.डॉ. प्रकाश कहाते, प्रा.डॉ. संजय शेगोकार, प्रा.डॉ. संजीवकुमार नागे, प्रा.डॉ. किशोर बिडवे, डॉ. राजेश ढगे, रवि पवार, पंकज कोकाटे, डॉ. संतोष चोंडके आदी परिश्रम घेतं आहेत.

टिप्पण्या